जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आलापल्ली येथील अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
आलापल्ली येथे  काल १६ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे  शेकडो घरांची पडझड झाली. अनेक नागरिक रस्त्यावर आले. या बाबीची दखल घेत   जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय  कंकडालवार यांनी  भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची  पाहणी केली.
यावेळी  पंचायत समिती उपसभापती राकेश तलांडे  अहेरी, सरपंचा  सुगंधा मडावी  आलापल्ली, माजी सरपंच  दिलीप गंज्जीवार आलापल्ली, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मित्रावर , सामाजिक कार्यकर्ते जुलेख शेख , सामाजिक कार्यकर्ते संतोष वसाके ,  सामाजिक कार्यकर्ते संजय मंथनवार, ग्रा. पं.सदस्य तावाडे   आलापल्ली, ग्रामसेवक डाकरे , पेसा कायदा अध्यक्ष  किशोर सडमेक ग्रा.पं.आलापल्ली,  तंटामुक्ती समिती अध्यक्ष  पिंटू  मोहूर्ले वेलगुर, गणेश सिडाम व  गावकरी  उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-17


Related Photos