चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
- सरपंचांविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर अनुसमर्थन घेण्यासाठी आयोजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील मौजा कोडशी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश गजानन कोल्हे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या व २२ सप्टेंबर २०२६ रोजी तीन-चतुर्थांश मताने संमत झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय, कोडशी बु. येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी, यांच्या २३ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी, कोरपना यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष ग्रामसभा होणार असून, अविश्वास प्रस्तावावर ग्रामसभा सदस्यांचे अनुसमर्थन घेणे, हा या सभेचा एकमेव विषय राहणार आहे. विशेष ग्रामसभेसाठी प्रचलित नियमानुसार आवश्यक गणपूर्ती असणे बंधनकारक राहील.ग्रामसभेत उपस्थित सदस्यांची अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने...
बातम्या -
Chandrapur
- आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निर्णयविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी १८ ठिकाणी आयोजित करण्यात आलेला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूरच्या सहायक आयुक्तांनी दिली आहे.युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील १८ ठिकाणी २९ सप्टेंबर रोजी रोजगार महाकुंभाचे आयोजन नियोजित करण्यात आले होते. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित क्षेत्रात आदर्श निवडणूक आचारसंहिता तातडीने लागू झाली आहे.या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात २९ सप्ट...
बातम्या -
Chandrapur
- विद्यार्थ्यांना कलाकौशल्यासोबत स्वयंरोजगाराच्या संधींचे मार्गदर्शनविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्याला चालना देत त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथील गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने लिप्पन आर्ट व कृत्रिम फुले तयार करणे या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद मिळाला.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. शास्त्री मॅडम होत्या. तर प्रा. वैष्णवी शास्त्री मॅडम यांनी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना लिप्पन आर्ट तसेच कृत्रिम फुले तयार करण्याच्या विविध पद्धतींची माहिती दिली. त्यांनी प्रत्यक्ष...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारात २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासह व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, हा कार्यक्रमाचा उद्देश होता.आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप गोंड उपस्थित होते. यावेळी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नेहा जीवतोडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. दुर्गेश साठवणे आणि सहाय्यक प्राध्यापिका समीक्षा चौधरी यांच...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : काही क्षणांपूर्वी घरातून हसत बाहेर पडलेले दोन तरुण पुन्हा कधीच परतले नाहीत. वरोरा तालुक्यातील बोपापूर येथील सौरभ रमेश हिरादेवे (२७ ) आणि अजित पंढरी हिरादेवे (३०) यांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वाहन परवान्यासंदर्भातील कामासाठी वरोऱ्यात गेलेल्या दोघांवर घरी परतताना काळाने घाला घातला.२३ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सौरभ आणि अजित हे दुचाकीने वरोऱ्याहून बोपापूरकडे परतत होते. लगान बारजवळ चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोघेही गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, सौरभ याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अजित याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पु...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जागतिक केमिस्ट दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बल्लारपूर, राजुरा आणि गडचांदूर येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. संघटनेचे जिल्हा संघटन सचिव प्रशांत गोठी यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालये आणि वृद्धाश्रमात फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. बल्लारपूर येथे मातोश्री वृद्धाश्रम तसेच ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करण्यात आले. यावेळी बल्लारपूर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष निशीकांत खैरे, सचिव ब्रिजेश उईके आणि स्वीकृत सदस्य प्रतीक चौकसे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालयात फळवाटपाचा उपक्रम घेण्यात आला. राजुरा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास रेगुंडवार आणि सचिव रोकेश अल्लुरवा...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत बल्लारपूर शहरातील शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी व मोबाईल सीडिंग पूर्ण करण्यासाठी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी याबाबत रास्तभाव दुकानदारांना निर्देश दिले आहेत.राज्य शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत २८, २९ व ३० सप्टेंबर रोजी सेवा सेतू कॅम्पच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी व मोबाईल सीडिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत मिशन सुधार अंतर्गत प्राप्त यादीनुसार लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करणे, मृत लाभार्थी वगळणे, दुबार लाभार्थ्यांची माहिती तपासणे तसेच उच्च उत्पन्न असलेल्या लाभार्थ्या...
बातम्या -
Chandrapur
- हरभरा, मसूर, करडई, ज्वारी व मक्यासाठी अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबतच कडधान्य, तेलबिया तसेच पौष्टिक तृणधान्य व भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी रब्बी हंगामात विविध पीक प्रात्यक्षिके आणि प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत हरभरा, मसूर, करडई, ज्वारी आणि मका या पिकांसाठी बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.विविध पिकांच्या बियाण्यांवर अनुदान -रब्बी हंगामातील प्रमाणित बियाणे वितरण...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य शासनाच्या सेवानिवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी महाउपलब्धी संदर्भातील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन २८ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी ११ वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेत महाउपलब्धी प्रणालीसंदर्भात सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना आवश्यक माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांना या प्रणालीचा वापर, आवश्यक प्रक्रिया आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.आवश्यक कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन -कार्यशाळेला उपस्थित राहणाऱ्या सर्व राज्य शासनाच्या सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी काही आवश्यक कागदपत्रे व माहिती सोबत आणावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय, च...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २३ व २४ सप्टेंबर २०२६ रोजी पीएम नगरपरिषद गांधी विद्यालय, बल्लारपूर येथे जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.अंडर-१७ मुलींच्या गटात पीएम नगरपरिषद गांधी विद्यालय, बल्लारपूरच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे गांधी विद्यालयाच्या मुलींच्या संघाची विभागीय स्तरावरील डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी संघात मानसी नरेश खंडागळे, हर्षिता विजय सातपुते, संबोधी मनोज पाटील, तपस्या अमरदीप ठेंगरे, स्नेहा शांताराम मडावी, हाफिजा जाकीर शेख आणि ज्...