आज गडचिरोली येथे अर्पण करणार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली


- उपस्थित राहण्याचे खा. अशोक नेते यांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे काल १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी निधन झाले. याबद्दल देशभरात दुःख व्यक्त केला जात असून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात दुपारी २ वाजता श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे.
आज १७ आॅगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या कार्याचा, कारकिर्दीचा तसेच विविध बाबींचा उलगडा याप्रसंगी मान्यवर करणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-17


Related Photos