महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डीजे आणि तीव्र ध्वनिक्षेपकांवर निर्बंध : पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे आदेश बातम्या - Chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डीजे आणि तीव्र ध्वनिक्षेपकांवर निर्बंध : पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी गणपती विसर्जन, नवरात्रोत्सव, दांडिया, दसरा तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डीजे आणि तीव्र ध्वनिक्षेपकांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, कायदा व नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३६ व ३८(१) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत.हे आदेश २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उत्सवांचे आयोजन होणार असल्याने उत्सव मंडळे, आयोजक तसेच नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट, अत्यंत तीव्र फ्लॅश लाईट तसेच म...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
५६ रक्तदात्यांनी जपली माणुसकीची नाळ : रक्तदानातून गरजूंच्या जीवनाला मिळाली आशेची नवी किरणे बातम्या - Chandrapur

५६ रक्तदात्यांनी जपली माणुसकीची नाळ : रक्तदानातून गरजूंच्या जीवनाला मिळाली आशेची नवी किरणे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : एखाद्याच्या जीवन-मरणाच्या संघर्षात रक्ताचा एक थेंबही अनमोल ठरतो. याच सामाजिक जाणिवेतून चंद्रपुरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल ५६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून माणुसकीचा अनोखा संदेश दिला. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त तसेच नगरसेविका सौ. श्वेता विप्लव लांडगे (तोतडे) यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराचे उद्घाटन महानगरपालिका चंद्रपूरचे उपमहापौर प्रशांत दानव यांच्या हस्ते करण्यात आले. स्थायी समिती अध्यक्ष मनस्वीताई संदीप गिऱ्हे या सहउद्घाटक म्हणून उपस्थित होत्या.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते तथा न...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
गोल पुलिया रस्त्याची खासदार प्रतिभा धानोरकरांकडून पाहणी : नगर परिषदेत विविध विषयांवर चर्चा बातम्या - Chandrapur

गोल पुलिया रस्त्याची खासदार प्रतिभा धानोरकरांकडून पाहणी : नगर परिषदेत विविध विषयांवर चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी २८ सप्टेंबर रोजी बल्लारपूर नगर परिषदेला सदिच्छा भेट देत शहरातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी नगर परिषद प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडून शहरातील विविध विषयांची माहिती घेण्यात आली.नगर परिषदेत आगमन झाल्यानंतर नगराध्यक्षा अल्का वाढई यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे स्वागत केले. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, गटनेते अब्दुल करीम, नगरसेवक इस्माईल ढाकवाला, पवन मेश्राम, स्वीकृत नगरसेवक भास्कर माकोडे, नगरसेविका वैशाली हुमणे, शिल्पा चुटे यांच्यासह नगर परिषदेतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.भेटीदरम्यान बल्लारपूर शहरातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवरील समस्या जाणून घेत त्यावर योग्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपुरात शेकडो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी : रोग निदान व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद बातम्या - Chandrapur

बल्लारपुरात शेकडो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी : रोग निदान व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नगर परिषद बल्लारपूरच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महिला व बालकल्याण समिती आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे), वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी गांधी विद्यालय, बल्लारपूर येथे भव्य मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो नागरिकांची नोंदणी करून विविध आजारांची तपासणी व उपचार करण्यात आले.सावंगी (मेघे) रुग्णालयाचे संचालक डॉ. अभिषेक जोशी आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रिया गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बल्लारपूरचे आरोग्य अधिकारी डॉ. डांगे तसेच ग्रामीण रुग्णालय बल्लारपूरच्या आरोग्य पथकानेही शिबिरात आरोग्यसेवा दिली. सावंगी रुग्णालयातील विवि...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
खेमजई ग्रामस्थांतर्फे भास्करराव पेरे पाटील यांचा ग्रामगीता देऊन नागरी सत्कार बातम्या - Chandrapur

खेमजई ग्रामस्थांतर्फे भास्करराव पेरे पाटील यांचा ग्रामगीता देऊन नागरी सत्कार


- आदर्श ग्रामविकासासाठी स्वच्छता, शेती व संस्कारांवर भर देण्याचे पेरे पाटलांचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / वरोरा : तालुक्यातील खेमजई येथे पाटोदा जि. छत्रपती संभाजीनगर चे ख्यातनाम आदर्श सरपंच भास्करराव पाटील पेरे यांच्या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामीण विकासातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल खेमजई ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता भेट देऊन त्यांचा भावुक सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोद गंपावर हे होते. तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मनीषा चौधरी, माजी उपसरपंच चंद्रहास मोरे, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक वसंतदादा निखाडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश अघडते आणि गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष शत्रुघ्न शेरकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.मार्गदर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने मुल-नागपूर बससेवा पुन्हा सुरू बातम्या - Chandrapur

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने मुल-नागपूर बससेवा पुन्हा सुरू


- २९ सप्टेंबरपासून सेवा सुरू; मुलवासीयांना मोठा दिलासा - वाढीव बससेवाही लवकरच सुरू होणारविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : मुल - नागपूर बससेवा सुरू झाल्याने मुल तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाची अडचण दूर झाली आहे. नागपूरशी जोडणारी ही बससेवा म्हणजे केवळ प्रवासाचे साधन नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, रुग्णांच्या उपचारांचा, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाचा आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजांचा आधार आहे.ही सेवा बंद झाल्याने निर्माण झालेली गैरसोय लक्षात घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय गांभीर्याने घेतला. परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक आणि परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मा. संजयजी सेठी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केल्यानंतरही ते केवळ पत्रव्यवहारावर थांबले नाहीत परिवहन मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने सेवा सुरू करण्य...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
आयपीएस कुमार सुशांत यांच्या धडक कारवाईत दोन रेती हायवा जप्त : ५१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात बातम्या - Chandrapur

आयपीएस कुमार सुशांत यांच्या धडक कारवाईत दोन रेती हायवा जप्त : ५१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / बल्लारपूर : अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवांवर सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांनी पहाटे धडक कारवाई केली. जुनोना परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत दोन हायवा व त्यातील रेती असा एकूण ५१ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.मंगळवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या पथकासह बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोंभुर्णा मार्गाने येणाऱ्या दोन हायवांवर संशय आल्याने जुनोना परिसरात त्यांची तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान एमएच ३४ सीक्यू ९९९६ आणि एमएच ३६ एए ८७०० क्रमांकाच्या दोन्ही हायवांमध्ये रेती भरलेली आढळून आली. सदर रेतीची वाहतूक अवैध पद्धतीने केली जात अस...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चंद्रपूर पोलिस दलात मोठा फेरबदल : २३ अधिकाऱ्यांच्या बदल्या बातम्या - Chandrapur

चंद्रपूर पोलिस दलात मोठा फेरबदल : २३ अधिकाऱ्यांच्या बदल्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा पोलिस दलातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सोमवारी २८ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आले. विनंतीवरून तसेच प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांमध्येही बदल झाला आहे.विनंतीवरून करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक विनोद रहांगडाले यांची नियंत्रण कक्ष, चंद्रपूर येथून कोरपना पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांची कोरपना येथून सिंदेवाही येथे, तर पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांची चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखा प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांची सिंदेवाही येथून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात बदली करण्य...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
गणरायाच्या विसर्जनाला AI सुरक्षेची साथ : चोरट्यांवर आणि तडीपारांवर पोलिसांची करडी नजर बातम्या - Chandrapur

गणरायाच्या विसर्जनाला AI सुरक्षेची साथ : चोरट्यांवर आणि तडीपारांवर पोलिसांची करडी नजर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : ढोल-ताशांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि हजारोंच्या गर्दीत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या गणपती विसर्जन सोहळ्याला यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची सुरक्षा लाभली. गणरायाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर पोलीस दलाने AI आधारित CCTV Surveillance Van च्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकांवर पावलोपावली नजर ठेवली. या तंत्रज्ञानामुळे तडीपार इसमांपासून गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरट्यांपर्यंत पोलिसांचे लक्ष पोहोचले.पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या संकल्पनेतून दाखल झालेल्या AI CCTV Surveillance Van चा गणेश विसर्जन काळात प्रभावी वापर करण्यात आला. या प्रणालीमध्ये चंद्रपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील गर्दीच्या ठिकाणी चोरी करणारे आरोपी तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडीपार करण्यात आलेल्या इसमांसह १ हजार ५०० हून अधिक आरोपीं...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
साहिल वाकोडे प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची बसपाची मागणी बातम्या - Chandrapur

साहिल वाकोडे प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची बसपाची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : दिवंगत साहिल वाकोडे यांच्याशी संबंधित कथित जातीय भेदभावाच्या प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभाव, मानसिक छळ आणि सामाजिक अन्यायाच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा तातडीने उभारावी, अशी मागणीही बसपाने केली. शिक्षणाच्या क्षेत्रात जातीय अन्याय सहन केला जाणार नाही. साहिल वाकोडे प्रकरणात न्याय मिळेपर्यंत संविधानिक आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार बसपाच्या पदाधिकाऱ्यां...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →