अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, ३ जण गंभीर जखमी, जुनी वडसा बसस्थानकाजवळील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
रात्रीच्या सुमारास आपले काम आटोपून घराकडे दुचाकीने जात असलेल्या दुचाकीस्वारांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटना काल २९ सप्टेंबर रोजी रात्री ८.३०  वाजताच्या सुमारास जुनी वडसा बसस्थानकाजवळ घडली.
शामराव कोल्हे (६५) , सचिन सहारे (३५) आणि प्रल्हाद गुंडरे (३०) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. शामराव कोल्हे याचे पाय तुटल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तिघेही दुचाकीस्वार आपले काम आटोपून जुनी वडसाकडे जात होते. दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-30


Related Photos