चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तिरुवनंतपुरम सेंट्रल ते हजरत निजामुद्दीनदरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ०६०७३/०६०७४ क्रमांकाची ही विशेष रेल्वे दोन्ही दिशांनी प्रत्येकी तीन फेऱ्या करणार आहे. या रेल्वेला बल्लारशाह आणि नागपूर स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.गाडी क्रमांक ०६०७३ तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून २, ९ आणि १६ नोव्हेंबर २०२६ रोजी रवाना होईल. ही रेल्वे मंगळवारी रात्री ९.२५ वाजता बल्लारशाह स्थानकावर पोहोचून ९.३० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. त्यानंतर बुधवारी रात्री १ वाजता नागपूर स्थानकावर आगमन होऊन १.०५ वाजता प्रस्थान करेल.परतीच्या प्रवासात गाडी क्र...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड-नागपूर महामार्गावर नवखळा येथील एम.जी. महाविद्यालयासमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.लक्ष्मण महादेव मरघडे (वय ६०), रा. आंबेडकर वॉर्ड, नागभीड असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मरघडे हे नेहमी गावात तसेच मुख्य रस्त्यावर फिरत असत. ३० ऑक्टोबरच्या रात्री ते नवखळा येथील एम.जी. महाविद्यालयासमोरील नागभीड-नागपूर महामार्गावर फिरत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.घटनेनंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, नागभीड येथे दाखल...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : आकर्षक व्याजदर आणि दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, चंद्रपूरने तब्बल १ हजार ३३२ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूरकडून तपास सुरू आहे. दरम्यान, ज्या गुंतवणूकदारांना अद्याप आपली रक्कम परत मिळालेली नाही, अशा सर्वांना आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या प्रकरणात चंद्रकिशोर नामदेव मांडवकर (वय ५२, रा. आनंदवन चौक, द्वारकानगरी, बोर्डा, ता. वरोरा) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची स्थापना २३ ऑक्टोबर २०२३ रोजी चंद्रपूर येथे करण्यात आल...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : न्यायाधीश, अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचारी तसेच न्यायालयात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथे वैद्यकीय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटन शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा चंद्रपूर जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.न्यायालयीन कामकाजादरम्यान न्यायाधीश, अधिवक्ता व कर्मचाऱ्यांना तातडीने प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांनी वैद्यकीय कक्षाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. त...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : आई-वडिलांपासून अचानक दुरावल्याने आनंदवन चौकात एकटीच फिरत रडणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीला वरोरा पोलिसांनी तत्परता दाखवत शोधून काढले. पोलिसांनी तातडीने हालचाली करून तिच्या पालकांचा शोध घेतला आणि चिमुकलीला सुखरूपपणे वडिलांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या माणुसकीपूर्ण आणि तत्पर कार्यामुळे एका कुटुंबाचा मोठा चिंतेचा प्रसंग टळला.प्राप्त माहितीनुसार, पोलीस स्टेशन वरोरा येथे CFA कॉल क्रमांक ४०६००६१२ द्वारे माहिती मिळाली की, आनंदवन चौक परिसरात एक लहान मुलगी एकटीच फिरत असून तिचे आई-वडील आसपास दिसत नसल्याने ती घाबरून रडत आहे. ही माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी रडणाऱ्या चिमुकलीची आस्थेने विचारपूस केली. तसेच तिच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. पोलि...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ग्राम पातळीवर झालेल्या कामाचे मुल्यमापन करण्यासाठी केंद्र शासनाने विशेष तपासणी चमुद्वारे, सर्व राज्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन कामांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष गुणवत्ता पुनरावलोकन चमुद्वारे २२ ते २७ ऑक्टोबर दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी करण्यात आली.या विशेष तपासणी दौऱ्यात राष्ट्रीय निरीक्षक अजय कुमार राजु यांच्या मार्गदर्शनात मानद राष्ट्रीय गुणवत्ता निरीक्षक शैलेन्द्रनाथ श्रीवास्तव आणि राज्य तांत्रिक सल्लागार डॉ. प्रशांत नगराळे यांनी जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या स्तरावरील कामांची निवड करून तपासणी केली. यातील एक काम चालु स्थितीत, एक काम पूर्ण झालेले आणि एक काम पूर्ण झाल्यानंतर देखभाल काळातील असावे, असे ठरले. त्यामुळे या कामाची प्राकलने व गुणवत्ता नोंद...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या अवैध किडनी विक्री प्रकरणाचा तसेच अवैध सावकारी प्रकरणाचा यशस्वी तपास करून उल्लेखनीय कामगिरी करणारे चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून सन २०२६ चे प्रतिष्ठित केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. यासोबतच सध्या रामनगर पोलीस ठाण्यात ठाणेदार म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनाही विशेष तपासातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हे पदक प्रदान करण्यात आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या यशामुळे चंद्रपूर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या पोलीस-१ विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला असून, केंद्रीय गृहमंत्री यांच्या मान्यतेने विशेष मोहीम, तपास आणि न्यायवैद्यक शास्त्र या क्षेत्रांत उल्ले...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा येथील लोकमान्य विद्यालयातील ८ वी मध्ये शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी आयुष राऊत आणि मानव एकरे यांना शाळा सुटल्यानंतर घरी परत जात असताना रस्त्यावर ५०० रुपयांची नोट सापडली. मात्र, त्या पैशांचा मोह न करता आणि ती नोट स्वतःकडे न ठेवता शाळेचे उपमुख्याध्यापक दीपक नवले यांच्याकडे प्रामाणिकपणे सुपूर्द करीत प्रामाणिकपणाचा परिचय करून दिला.या दोन्ही विद्यार्थ्यांनी दाखविलेला हा प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्यांची जाणीव कौतुकास्पद आहे. त्यांच्या या आदर्श कृतीची प्रेरणा इतर विद्यार्थ्यांनीही घ्यावी, या उद्देशाने शुक्रवार ला शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांसमोर आयुष राऊत आणि मानव एकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मुख्याध्यापक राहुल राखे यांनी ...
बातम्या -
Chandrapur
- वरोरेकर सर्वपक्षीय स्नेहमंचाद्वारे आयोजित कोजागिरी पौर्णिमा उत्सवात प्रतिपादन.विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : लोकांच्या मूलभूत गरज आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरिता विकास कामे करणे गरजेचे आहे. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात सिंचन, पिण्याचे पाणी, रस्ते, दिंडोरा बॅरेज प्रकल्प आदी समस्या पूर्णत्वास न्यायच्या असतील तर श्रेयवादाच्या लढाईत न पडता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रतिभा धानोरकर यांनी केले. वरोरेकरांच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय कोजागिरी स्नेहसंमेलनामध्ये त्या बोलत होत्या.शेतकरी भावनांमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात आ. करण देवतळे यांचेसह प्रसिद्ध उद्योजक प्रकाश मुथा, लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील, उद्योजक डॉ. रमेश राजुरकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : महिला व बालकांचे संरक्षण, त्यांचे हक्क, सुरक्षितता आणि सक्षमीकरण याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ३० ऑक्टोबर रोजी पंचायत समिती पोंभुर्णा येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाइल्ड हेल्पलाइनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सेवांची माहिती अंगणवाडी सेविकांना देण्यात आली.या कार्यक्रमाला तालुक्यातील सुमारे १५० महिला व अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, परिविक्षा अधिकारी अतीश चव्हाण, कनिष्ठ संरक्षण अधिकारी पंछीमारे, गटविकास अधिकारी वाढई, अंगणवाडी पर्यवेक्षिका शेरकी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थि...