महत्वाच्या बातम्या

 नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देसाईगंज : वडसा वनविभागात हत्तींचे आगमन झाले होते. अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकाचे हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. हत्तींच्या कळपाचे छत्तीसगड राज्यातून आगमन झालेले असून काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील आंधळी, नवरगाव, चिखली येथील शेतकऱ्यांचे भागातील मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच देसाईगंज तालुक्याच्या बोळधा येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वनविभागाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली. सध्या हे हत्ती कोरची तालुका व छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत आहेत. उन्हाळ्यात देसाईगंज तालुक्यात भाजीपाला व उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले जात असल्याने हत्तीसांठी खाद्य मिळते. त्यामुळे पुन्हा हत्ती परतण्याची शक्यता आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos