आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातुन गरीबांच्या सेवेची संधी शेवटच्या घटकांपर्यत योजना पोहोचवा


 - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही समाजातील वंचीत, गरीब कुटुंबांतील नागरीकांच्या सेवेची संधी आहे. या योजनेला गरीब, आर्थिकदृष्टया कमकुवत कुटुंबांपर्यत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनीधी, शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था यासह सर्वानी  सहकार्य करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
प्रधानमंत्री आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लोकार्पण आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बचत भवन सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, महापौर  श्रीमती नंदाताई जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने, तसेच सर्वश्री आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, मल्लीकार्जुन रेड्डी,  कृष्णा खोपडे, विकास कुंभारे उपस्थित होते.
आयुष्मान भारत ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा योजना असल्याचे सांगुन श्री. नितीन गडकरी म्हणाले की गरीबांना  उत्तम  आरोग्य देण्याचा या योजनेचा हेतु आहे. वैद्यकीय उपचार हे बरेचदा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात. सामान्यांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये कर्करोग, मानसीक रोग यावर देखील या योजनेत उपचार करण्यात येतील. जिल्हयातील 3.77 लक्ष  लाभार्थ्याना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यापैकी ग्रामीण भागात 1 लाख 76 हजार तर शहरी भागात 2 लाख 398 लाभार्थी आहेत. सध्या  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व डागा स्मृती महाविद्यालयाचा या योजनेमध्ये अंतर्भाव करण्यात आला  आहे.
पुर्णपणे निशुल्क असणारी ही योजना आरोग्यसेवेतील महत्वाचा टप्पा आहे. राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना सोबतच ही
योजना राबविण्यात येणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी नितीन दौडकर, वर्षा ठोंबर, देवीदास मेश्राम, अनिल साठे, गजानन सोनटक्के, किशोर दुधबर्वे, रामु तेंलग, दिपक बर्वे, नारायण  मुडडमवार या निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात या योजनेच्या ई-कार्डाचे वाटप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.  झारखंड राज्यातील रांची येथे प्रधानमंत्री यांच्या हस्ते झालेल्या देशपातळीवरील कार्यक्रमाचे प्रक्षेपण यासेळी सभागृहात दाखविण्यात आले.  जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अतिरीक्त महानगरपालिका आयुक्त रविंद्र ठाकरे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, आरोग्य  उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल यांचीदेखील यावेळी उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.पातुरकर, संचालन रेणुका देशकर तर आभार जिल्हा आरोग्य अधिकारी योगेंद्र  सवाई यांनी मानले.

योजनेची वैशीष्टये
ही योजना पूर्णपणे निशुल्क आहे. सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश (गुडघा, खुबा, कोपर, प्रत्यारोपण), लहान मुलांच्या कर्करोगाचा
उपचारांचा समावेश, मानसिक आजरावरील उपचारांचा समावेश, प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाखाच्या रकमेचे मोफत उपचार, इतर राज्यातील
लाभर्थी कुटुंबे योजनेचा लाभ घेऊ शकतात, कुटुंबाचा समावेश लाभार्थ्याचा यादीत होत असल्यास संगणक प्रणालीद्वारे कुटुंब सदस्यास ई-कार्ड
मिळण्याची तरतूद, केंद्रचा 60 टक्के हिस्सा तर राज्याचा 40 टक्के हिस्सा, 1000 पेक्षा जास्त उपचारांचा लाभ, प्रधानमंत्री जन आरोगय योजना व
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांची एकत्रितपणे अंमलबजावणी, योजना पूर्णपणे संगणीकृत, प्रधानमंत्री जन आरोग्य
योजना सुरवातीला 79 शासकीय रूग्णालयात लाभार्थ्यांना उपचार देणार, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या 489 अंगीकृत
रूग्णालयामार्फत पूर्वीप्रमाणे 971 उपचारांची सेवा मिळणार, अंगीकृत रूग्णालयात आयुष्मान मित्रांची नेमणूक  Print


News - Nagpur | Posted : 2018-09-23


Related Photos