महत्वाच्या बातम्या

 जगातील सर्वात महाग भाजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : या भाजीचा इतिहास  हॉप शूट्स (Hop Shoots) नावाच्या या भाजीची नुकतीच बिहारमध्ये लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या भाजीला हजारो वर्षांचा इतिहास असून याच्या पानांना हॉप्स असं म्हटलं जातं. हजारो वर्षांपूर्वी बिअरमध्ये कडूपणासाठी याचा वापर केला जात असे. त्यानंतर हळूहळू जेवणामध्ये चवीसाठी आणि औषधांमध्ये उपयोग होऊ लागला. याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यानंतर भाजी म्हणून देखील याचा वापर होऊ लागला. 8 व्या शतकात जर्मनीमध्ये याचं सर्वात आधी उत्पादन झाल्याचं प्रमाण मिळतात. यानंतर इंग्लंडबरोबर अनेक युरोपीय देशांमध्ये ही भाजी लोकप्रिय झाली. 16 व्या शतकापर्यंत इंग्लंडमध्ये यावर प्रतिबंध घालण्यात आले होते तर जर्मनीमध्ये राजकाणार आणि धर्मामध्ये याची मागणी असल्यानं ही भाजी टॅक्समुक्त करण्यात आली होती. यावरून या भाजीचा इतिहास खूप जुना असल्याचं दिसून येत आहे. सध्या अमेरिकेत याचं सर्वात जास्त उत्पादन होत असून जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरातील मोजक्याच देशांमध्ये याच उत्पादन होत असून भारतात बिहारमध्ये याचं उत्पन्न घेण्यास सुरुवात झाली आहे. भाज्यांच्या श्रेणीत अशी भाजीही आहे, ज्याची किंमत हजार नाही, 10 हजार नाही तर 85 हजार रुपये किलो आहे. त्याचे नाव हॉप शूट ( Hop shoots vegetable Information In Marathi ) आहे, ज्याला सर्वात महाग भाजी म्हणून देखील ओळखले जाते. हॉप वनस्पती सामान्यतः बिअरशी संबंधित आहे कारण त्याची फुले अल्कोहोलयुक्त पेय तयार करण्यासाठी वापरली जातात. तथापि, फुलांची कापणी केल्यानंतर हॉप कोंब झाडांमधून काढले जात नाहीत. ज्यासाठी बाजारपेठेत स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, एक किलोग्रॅम हॉप शूटची किंमत 1,000 GBP पर्यंत म्हणजेच 85,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत असू शकते. ही भाजी महाग आहे कारण ती वाढवणे आणि काढणे हे श्रम-केंद्रित, “बॅक ब्रेकिंग” काम आहे. हॉप, Humulus lupulus, समशीतोष्ण उत्तर अमेरिका, युरेशिया आणि दक्षिण अमेरिका मध्ये घेतले जाते. हॉप उष्णकटिबंधीय हवामानात चांगले वाढते, परंतु भारतात त्याची लागवड फायदेशीर नाही. हॉप शूट्सचा अनेक प्रकारांमध्ये औषधी वापर केला जातो. बर्‍याच अभ्यासात असे आढळून आले आहे की हॉप शूट्स अँटीबॉडीज तयार करू शकतात जे शरीरात उपस्थित असलेल्या अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. चिंता, निद्रानाश, अस्वस्थता, तणाव, आंदोलन, अटेंशन डेफिसिट-हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी), चिंताग्रस्तपणा आणि चिडचिड बरे करण्यासाठी देखील हे महत्वाचे आहे.

एका संशोधनानुसार, हे ऍसिड कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकतात आणि ल्युकेमिया पेशींना रोखू शकतात. यामध्ये असलेले गुणधर्म कर्करोगासारख्या अनेक प्राणघातक आजारांशी लढण्यासाठी शक्तिशाली आहेत. हॉप शूट्समध्ये शंकूच्या आकाराची फुले असतात ज्याला स्ट्रोबिल्स म्हणतात, जे बिअरच्या गोडपणात संतुलन राखण्यासाठी स्टॅबिलायझर म्हणून काम करतात. हॉप शूट्स वनस्पतींच्या एकसमान पंक्तींमध्ये वाढत नाहीत, याचा अर्थ त्यांची कापणी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. याशिवाय त्याच्या फांद्याही लहान असतात. हे तण किंवा औषधी वनस्पती सारखे मानले जातात. एक किलोग्रॅम बनवण्यासाठी शेकडो हॉप शूट्स लागतात, जे त्याची किंमत वाढवण्याचा एक प्रमुख घटक आहे. ही भाजी पिकायला आणि काढणीसाठी तयार होण्यासाठी तीन वर्षे लागतात. झाडाला लहान, नाजूक हिरव्या टिपा असल्यामुळे, त्याची कापणी अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते, त्यासाठी अंगमेहनतीची आवश्यकता असते. याशिवाय पिकाची देखभाल 3 वर्षे केली जाते, जे फार कठीण काम आहे. म्हणूनच हॉप शूटची किंमत खूप जास्त आहे.  हॉप शूट्सच्या (Hop Shoots) भाजीचा सर्वात मोठा ग्राहक हा अमेरिका आहे. हॉप शूट्सची (Hop Shoots) भाजी बाजारात सहसा मिळत नाही. या भाजीचा उपयोग हा अँटिबायोटीक बनवण्यासाठी केला जातो. टीबीच्या उपचारासाठी हॉप शूट्सपासून (Hop Shoots) बनवलेले औषध अधिक प्रभावी असते. या भाजीच्या फुलांचा उपयोग बिअर बनवण्यासाठी केला जातो. याच्या फुलांना हॉप कोन्स म्हणतात. भाजीच्या फाद्यांचा उपयोग हा खाण्यासाठी केला जातो. यापासून लोणचंही तयार केलं जातं. तेही खूप महाग असतं. युरोपीय देशात या भाजी शेती मोठ्या प्रमाणात होते. ब्रिटन आणि जर्मनीतील नागरिकांना ही भाजी फार आवडते. वसंत ऋतुचा काळ या भाजीच्या शेतीसाठी लाभदायक असतो. आपण पुन्हा प्रयत्न करू. हॉप शूट्सच्या (Hop Shoots) शेतीने शेतकऱ्यांचं भाग्य उजळू शकतं. शेतकऱ्यांना या भाजीची माहिती मिळाल्यावर ते पारंपरिक शेती सोडून या भाजीच्या शेतीसाठी प्रयत्न करतील, असं अमेरश म्हणाले. औषध आणि बियर बनवण्यासाठी हॉप शूट्सचा वापर हॉप शूट्स ही भाजी बाजारात उपलब्ध नसते. त्याचा वापर अँटीबॉयोटिक औषधं बनवण्यासाठी केला जातो. टीबीच्या उपचारांमध्ये हॉप शूट्सद्वारे बनवलेलं औषध फायदेशीर ठरतं. या भाजीच्या फुलांचा वापर बियर बनवण्यासाठी केला जातो. या भाजीच्या फुलांना हॉप कोन्स म्हणतात. तर भाजीचे देठ खाल्ल्या जातात. या भाजीचं लोणचंही बनतं, जे फारच महाग असतं. युरोपातील अनेक देशांमध्येमध्ये या भाजीचं पीक घेतलं जातं. ब्रिटन आणि जर्मनीमधील लोकांना ही भाजी फार आवडते. वसंत ऋतु हा हॉप शूट्सच्या शेतीसाठी योग्य समजला जातो. ही भाजी अँटीऑक्सिडेंटचा समृद्ध स्रोत असल्याने त्वचेला चमकदार आणि चिरतरुण ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. भारतात संशोधन सुरु भारत सरकार सध्या या भाजीच्या शेतीवर संशोधन करण्यास भर देत आहे. वाराणसीमधील भाजीपाला संशोधन संस्थेत या भाजीच्या शेतीवर फार मोठं काम सुरु आहे. अमरेश कुमार यांनी या भाजीची शेती करण्याच इच्छा व्यक्त केली होती, ती मान्य करण्यात आली. जर त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले तर त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांचंही नशीब फळफळेल.

जगभरात अनेक भाज्यांचे उत्पादन घेतलं जातं. तुम्हाला विविध प्रकारच्या अनेक भाज्या माहीत असतील. पण जगभरातील सर्वां त मौल्यवान भाजी तुम्हाला माहीत आहे का? महत्त्वाचं म्हणजे या भाजीसाठी 17 व्या शतकात इंग्रजांना कायदा(British Law)  करावा लागला होता. या भाजीचं उत्पादन जगभरातील  मोजक्याच देशांमध्ये होतं. या भाजीला खूप जुना इतिहास असून नशेच्या पदार्थांमध्ये (Alcoholic Drink)  या भाजीचा वापर करण्यात येतो. याचबरोबर या भाजीमध्ये औषधी गुणधर्म( Medicine) असून औषधं तयार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला या भाजीविषयी सांगणार आहोत. या महागड्या भाजीचं आपल्या देशातही उत्पन्न होतं. बिहारमधले काही शेतकरी याचं उत्पन्न घेत आहेत.   इंडियन व्हेजिटेबल रिसर्च इंस्टीट्यूट( Indian Institute of Vegetable Research) वाराणसीमध्ये या हॉप शूट्सची (Hop Shoots)  लागवड केली जाते. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी अमरेश सिंह यांनी याठिकाणाहून याचे बी आणून ते लावलं. याची लागवड केल्यानंतर हळूहळू त्यांना उत्पादन मिळू लागलं. महत्त्वाचं म्हणजे याच्या विशेष मागणीवरच या  हॉप शूट्सची खरेदी आणि विक्री केली जाते. त्यांनी सुरुवातीला याची लागवड केल्यानंतर 60 टक्के उत्पादन मिळालं. या पिकामधून इतर पिकांच्या तुलनेत 10 पट अधिक फायदा होता असल्याचं सिंह यांनी म्हटलं. बिहारसारख्या गरीब राज्यात या पिकामुळं शेतकऱ्यांचं नशीब बदलू शकतं असं मतदेखील सिंह यांनी व्यक्त केलं. याचबरोबर केंद्र सरकारने या पिकाच्या लागवडीमध्ये शेतकऱ्यांना मदत केल्यास शेतकऱ्यांच उत्पन्न 10 पट अधिक वाढणार असल्याचं मतदेखील याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. हॉप शूट्स (Hop Shoots) ही भाजी उकडून खाल्ली जाते. इतर भाज्यांप्रमाणे देखील याचं सेवन केलं जाऊ शकतं. बटर किंवा विविध प्रकारच्या सॉसबरोबर या भाजी खाल्ली जाते. यीस्ट, कँडी आणि जिलेटिनमध्ये हॉप्सचा वापर केला जातो. याचबरोबर आईस्क्रीम, पुडिंग, बेक फूड, च्युइंगममध्ये देखील हॉप शूट वापरल्या जातात. हॉप शूट्सचं तेल काढून देखील वापरलं जाऊ शकतं.  टिबायॉटिक तयार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. या झाडाच्या मुळांपासून बनवलेलं औषध टीबीच्या(TB) उपचारामध्ये उपयोगी ठरत असल्याचं देखील बिहारमधील शेतकरी अमरेश सिंह यांनी म्हटलं आहे. या पिकाचे उत्पादन करणे खूप अवघड काम आहे. लंडनमध्ये हॉप शूट्सची (Hop Shoots) विक्री करणाऱ्या  मेलिसा कोल यांच्या माहितीनुसार या पिकाचे उत्पादन खूप कमी प्रमाणात होते. याचबरोबर याच उत्पादन आणि निगा राखणं खूप अवघड काम आहे. काहीवेळा याच्या पानांची वाढ होत नसल्यानं मोठ्या क्षेत्रामध्ये याची लागवड केल्यास विक्रीयोग्य उत्पादन होतं. अतिशय दुर्मिळ आणि कमी उत्पादन होत असल्यानं याची किंमत जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या पिकाचा औषधी लाभाबरोबरच अनेक गोष्टींसाठी फायदा आहे. टीबीच्या (TB) उपचारावर उपयोगी असण्याबरोबरच कँसरवर (Cancer) देखील ही भाजी खूपच लाभदायक आहे. कँसरच्या पेशींना रोखन्यासाठी हॉप शूट्स खूपच फायदेशीर आहे. याचबरोबर महिलांच्या मोनोपॉज सारख्या समस्येवर देखील हॉप शूट्स फायदेशीर आहे. याचबरोबर इनसॉम्निया म्हणजेच झोप न येण्यावर देखील गुणकारी आहे.चिंता, हायपरॅक्टिव्हिटी, चिंताग्रस्तता, शरीरावर वेदना, अस्वस्थता, लैंगिक संसर्ग, धक्का, तणाव, दातदुखी, अल्सर, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवर देखील हॉप शूट्स खूपच गुणकारी आहे. केसांमधील कोंडा म्हणजेच डँड्रफवर देखील हॉप शूट्स गुणकारी आहे.

- प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे ,

- निर्सग अभ्यासक

- 9403510981, 9423638149





  Print






News - Editorial




Related Photos