माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची व्याहाड बुज येथे भेट देत बाटवे कुटुंबाचे केले सांत्वन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सवली : माणुसकी आणि आपुलकीचे नाते जपत माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील शोकाकुल बाटवे कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सामील होऊन सांत्वन केले. व्याहाड बुज येथील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माधवीताई बाटवे यांचा मुलगा स्व. गिरीश मधुकर बाटवे यांचे २५ ऑगस्ट २०२६ रोजी अवघ्या ३१ व्या वर्षी अल्पशा आजाराने अकाली निधन झाले. ऐन उभारीच्या वयात काळाने घातलेल्या या अचानक घालामुळे बाटवे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुःखद घटनेची माहिती मिळताच डॉ. अशोकजी नेते यांनी तत्परतेने व्याहाड बुज येथील बाटवे यांच्या निवासस्थानी पोहोचून कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. गिरीशचे असे अचानक निघून जाणे अत्यंत वेदनादायी असून या कठीण प्रसंगात संपूर्ण भाजप परिवार आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशा शब्दांत डॉ. नेते यांनी भावना व्यक्त करत शोकाकुल कुटुंबीयांना धीर दिला.
राजकीय व सामाजिक जीवनापलिकडे जाऊन दुःखाच्या प्रसंगात धावून जात दाखवलेली ही माणुसकी आणि तत्परता उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी तालुकाध्यक्ष अविनाश पाल, भाजप तालुकाध्यक्ष किशोर वाकुडकर, भाजप तालुका महामंत्री सचिन तंगडपल्लीवार, सावलीचे ठाणेदार पुल्लुरवार साहेब, मुसळे साहेब, डोनाळाचे उपसरपंच जितू सोनटक्के, सामाजिक नेते डॉ. मनोहर तोडेवार, युवा नेते सूरज किनेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Petrol Price




