विद्यार्थ्यांचा असाही प्रामाणिकपणा....!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा येथील लोकमान्य विद्यालयातील ८ वी मध्ये शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी आयुष राऊत आणि मानव एकरे यांना शाळा सुटल्यानंतर घरी परत जात असताना रस्त्यावर ५०० रुपयांची नोट सापडली. मात्र, त्या पैशांचा मोह न करता आणि ती नोट स्वतःकडे न ठेवता शाळेचे उपमुख्याध्यापक दीपक नवले यांच्याकडे प्रामाणिकपणे सुपूर्द करीत प्रामाणिकपणाचा परिचय करून दिला.
या दोन्ही विद्यार्थ्यांनी दाखविलेला हा प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्यांची जाणीव कौतुकास्पद आहे. त्यांच्या या आदर्श कृतीची प्रेरणा इतर विद्यार्थ्यांनीही घ्यावी, या उद्देशाने शुक्रवार ला शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांसमोर आयुष राऊत आणि मानव एकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मुख्याध्यापक राहुल राखे यांनी शुभेच्छा दिल्या . शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्ये रुजणे महत्त्वाचे आहे. हे या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याचे उप मुख्याध्यापक नवले म्हणाले.




Petrol Price




