मद्दिगुडम शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कविता पोटे यांची पुनर्निवड : सुनीता गुंडावार उपाध्यक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : पंचायत समिती अहेरी अंतर्गत येत असलेल्या वेलगूर केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मद्दिगुडम येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालक, विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.
या प्रक्रियेत कविता पोटे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली, तर सुनीता गणेश गुंडावार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कविता पोटे यांनी यापूर्वीही समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली असून, पुनर्गठनाच्या प्रक्रियेत त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक विकासाला चालना देणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे तसेच शाळेच्या गरजा व विकासकामांमध्ये पालकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी नवनिर्वाचित अध्यक्ष कविता संतोष पोटे व उपाध्यक्ष सुनीता गणेश गुंडावार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने परस्पर समन्वयाने काम करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. समितीच्या पुनर्गठनामुळे शाळेच्या विविध शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांना अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास मदत होणार आहे.




Petrol Price




