महत्वाच्या बातम्या

 ११ फेब्रुवारीला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन 11 फेब्रुवारी  रोजी जिल्हा न्यायालय येथे करण्यात आले आहे. नागरिकांनी वाद मिटविण्यासाठी लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जयदिप पांडे यांनी केले आहे.

लोक अदालतीलचा उद्देश मोठया प्रमाणावर प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच नवीन प्रकरणे किंवा महत्वाची प्रकरणे लोक न्यायालयासारख्या यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित निकाली व मोठ्या प्रमाणात निवारण करणे आहे. मोठ्या प्रमाणावरील प्रलंबित प्रकरणामधून योग्य प्रकरणांची छाननी करुन आपसी समझोत्यासाठी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवणे आहे.

समझोता योग्य फौजदारी प्रकरणे, पराक्राम्य दस्ताऐवज अधिनियमाच्या कलम १३८ ची प्रकरणे, अधिकोष वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, अपघात माहिती अहवाल, राज्य परिवहनाची प्रकरणे, वैवाहिक/कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, श्रमिकांचे वाद व त्यांच्या पुर्नरनियुक्तीमधील जुन्या वेतनासंबंधीची प्रकरणे (कामगारांसंबंधी निस्तारणासंबंधीचे दावे, पॉलिसी, औद्योगिक कामगारांच्या वेतनासंबंधीचे आणि इतर प्रलंबित फायदयांची प्रकरणे), भू-संपादन प्रकरणे, वीजेची आणि पाणी बिलाची (सोबत चोरीची) प्रकरणे, नौकरी संबंधी प्रकरणे ज्यामधील पैसे आणि भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतरच्या फायद्यासंबंधित प्रकरणे, महसूल प्रकरणे आदी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कोर्टातील न्यायालयातील प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे विविध स्थानी आपसी समझोत्यासाठी ठेवण्यात येणार आहे.


ग्राहक तकारीचे संबंधित प्रकरणे

लोकअदालतीमध्ये पुर्वबोलणी आणि समोपचाराने पक्षकारांमधील वाद खेळीमेळीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहे. लोकअदालतीच्या दिवशी प्रकरणातील वादात आपसी समझोता घडून आणण्याकरीता त्या समस्येची आगाऊ सूचना संबंधितांना देवून विचारविनिमय व चर्चेच्या माध्यमातून वादग्रस्त समस्या प्रभावीपणे आपसी समझोत्याद्वारे निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लोकअदालतीमध्ये पक्षकारांचे मोठ्या प्रमाणावरील प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढण्यात येणार आहे.

या सुवर्ण संधीचा लाभ राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून घ्यावा. तसेच जास्तीत जास्त प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवून त्यांचा निपटारा करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदिप गो. पांडे यांनी सर्व संबंधित पक्षकारांना केले आहे. संबंधित पक्षकारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.





  Print






News - Nagpur




Related Photos