महत्वाच्या बातम्या

 श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्य शासकीय कार्यक्रम संपन्न


 - श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक : खासदार रामदास तडस यांचे प्रतिपादन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य संपुर्ण समाजाला दिशादर्शक स्वरुपाचे होते, त्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेमध्ये आपल्या लेखणीतुन आपल्याला अमुल्य असा ठेवा उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यांचे कार्य आजही आम्हाला दैनदिन जिवणात चांगले कार्य करण्याचे उर्जा निर्माण करुण देते, अशा या थोर संताला जयंती दिनानिमीत्य विनम्र अभिवादन असे, प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. नवी दिल्ली येथे महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र सदन श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रम आयोजीत केलेला होता, त्या कार्यक्रमात खासदार तडस बोलत होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री चंद्रकांत हांडोरे, महाराष्ट्र शासनाचे निवासी सहआयुक्त डॉ. राजेश आडपवार, महाराष्ट्र शासनाचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी श्री. संत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमीत केला होता. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जयंती सोहळा साजरा केला जात आहे. याबद्दल खासदार रामदास तडस यांनी समाधान व्यक्त करुन देवेन्द्र फडणवीस यांचे आभार मानले.





  Print






News - Rajy




Related Photos