महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

सिंदेवाही पोलिस स्टेशन कडून सार्वजनिक गणेश  मंडळांचा गौरव : मिनघरी गणेश मंडळ ठरले अव्वल ! बातम्या - Chandrapur

सिंदेवाही पोलिस स्टेशन कडून सार्वजनिक गणेश  मंडळांचा गौरव : मिनघरी गणेश मंडळ ठरले अव्वल !


- गणेशोत्सवाला सामाजिक कार्याची जोड विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : पोलीस स्टेशन तर्फे गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा व्हावा तसेच समाजात महत्वपुर्ण विषयांवर जनजागुती निर्माण व्हावी यासाठी सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या वतीने परिसरातील सार्वजनिक गणेश उत्सव मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.सदर स्पर्धेचे मुल्यांकन निकष हे पांरपारिक वादय, गाव स्वच्छता अभियान, स्पर्धेत भाग घेण्याऱ्या मंडळात महिला, बालक, तरूण व जेष्ठ नागरिक यांचा समावेश असावा, समाज प्रबोधन देखावे, वृक्ष लागवड, व्यसनमुक्त मंडळ, मंडळामध्ये सोशल मिडीयांचा समारात्मक वापर, मुर्ती पर्यावरणपुरक असावी, मंडळात स्वयसेवक शिस्तीचे पालन, विसर्जन दिलेल्या वेळेत पुर्ण करणे, शासकिय नियमांचे पालन, विज नियमानुसार घेणे अशा प्रकारच...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बेलसनीतील पोलाद कंपनीत २५ ते ३० जणांचा जबरदस्तीने प्रवेश : काम बंद पाडण्याची धमकी बातम्या - Chandrapur

बेलसनीतील पोलाद कंपनीत २५ ते ३० जणांचा जबरदस्तीने प्रवेश : काम बंद पाडण्याची धमकी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी २५ ते ३० महिला-पुरुषांनी बेलसनी येथील धमिलियन पोलाद कंपनीच्या प्रवेशद्वारावर गोंधळ घालत जबरदस्तीने कंपनीत प्रवेश केल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. यावेळी कंपनीचे काम बंद पाडण्याची धमकी दिल्याप्रकरणी घुग्घुस पोलिसांनी सहा नामनिर्देशित आरोपींसह इतरांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील मुरसा येथील जगदीश लवाडिया हा २५ ते ३० महिला-पुरुषांना घेऊन कंपनीच्या प्रवेशद्वारावर पोहोचला. यावेळी त्यांनी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक निखिल राय यांची भेट घडवून देण्याची मागणी केली. त्यानंतर प्रकल्प व्यवस्थापक अखिलेश रॉय हे प्रवेशद्वारावर आले आणि त्यांनी चर्चेसाठी सर्वांना कार्यालयातील कक्षात बोलावल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शहीद बाबुराव शेडमाकेंचा विद्रोह आजही जिवंत : आदिवासी स्वाभिमानाच्या लढ्याला नवी प्रेरणा! बातम्या - Chandrapur

शहीद बाबुराव शेडमाकेंचा विद्रोह आजही जिवंत : आदिवासी स्वाभिमानाच्या लढ्याला नवी प्रेरणा!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्याची मशाल पेटवणारे, गोंडवाना भूमीचा स्वाभिमान आणि अस्तित्वासाठी प्राणांची आहुती देणारे क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांचा संघर्ष आजही प्रत्येकाच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ निर्माण करतो. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडणाऱ्या या आदिवासी क्रांतिकारकाचे बलिदान केवळ इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित नसून, जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या आजच्या संघर्षालाही दिशा देणारे आहे. शहीद शेडमाके यांचा विद्रोही विचार आणि त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका उषाकिरण आत्राम यांनी केले.गोंडियन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या वतीने रविवारी १ चंद्रपुरातील तुकूम येथील मातोश्री विद्यालयाच्या सभागृहात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके गोंडवाना स...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सरदार पटेल महाविद्यालयात विकसित भारत युवा संवाद व जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा उत्साहात बातम्या - Chandrapur

सरदार पटेल महाविद्यालयात विकसित भारत युवा संवाद व जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : युवकांमधील नेतृत्वगुण, वैचारिक क्षमता आणि लोकशाही मूल्यांची जाणीव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मेरा युवा भारत, चंद्रपूर, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार आणि सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विकसित भारत युवा संवाद व जिल्हास्तरीय विकसित भारत युवा संसद हा कार्यक्रम २ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयात उत्साहात पार पडला. या स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल १४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या विचारांचे प्रभावी सादरीकरण केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर होते. प्रमुख अतिथी म्हणून मेरा युवा भारत, चंद्रपूरचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, नागपूरचे युथ आयकॉन अमन भंडारकर, स्पर्धेचे परीक्षक तथा गोंडवाना विद्याप...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वेकोलि बाधित गावांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा : शुद्ध पाणी, रोजगार आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित बातम्या - Chandrapur

वेकोलि बाधित गावांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा : शुद्ध पाणी, रोजगार आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : वेकोलि बाधित गावांमधील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासह स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदत मिळवून देण्याच्या प्रश्नांवर भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर हंसराज अहीर यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात २ नोव्हेंबर रोजी त्यांनी वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक संजय मिश्रा यांची भेट घेऊन विविध जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.या बैठकीत वेकोलि बाधित गावांमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. विशेषतः नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वेकोलिच्या सीएसआर निधीतून आरओ वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारण्याची मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे यावेळी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
लोक सहभागातून दोन गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी : दुष्काळी परिस्थितीत १५ ते २० हेक्टर क्षेत्रातील पिकांना मिळणार जीवनदान बातम्या - Chandrapur

लोक सहभागातून दोन गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी : दुष्काळी परिस्थितीत १५ ते २० हेक्टर क्षेत्रातील पिकांना मिळणार जीवनदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाच्या पुढाकारातून मौजा नांदगाव पोडे आणि मौजा कवडजई येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली हा जलसंधारण उपक्रम राबविण्यात आला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने शेतकरी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.यावर्षी परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका पिकांना बसत आहे. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली असताना कृषी विभागाने पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम हाती घेतला. या बंधाऱ्यांमुळे उपलब्ध पाणी अडवून त्याचा सिंचनासाठी वापर करणे शक्य होणार आहे. विश...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
लोक सहभागातून दोन गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी : दुष्काळी परिस्थितीत १५ ते २० हेक्टर क्षेत्रातील पिकांना मिळणार जीवनदान बातम्या - Chandrapur

लोक सहभागातून दोन गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी : दुष्काळी परिस्थितीत १५ ते २० हेक्टर क्षेत्रातील पिकांना मिळणार जीवनदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाच्या पुढाकारातून मौजा नांदगाव पोडे आणि मौजा कवडजई येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली हा जलसंधारण उपक्रम राबविण्यात आला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने शेतकरी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.यावर्षी परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका पिकांना बसत आहे. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली असताना कृषी विभागाने पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम हाती घेतला. या बंधाऱ्यांमुळे उपलब्ध पाणी अडवून त्याचा सिंचनासाठी वापर करणे शक्य होणार आहे. विश...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शहीद बाबुराव शेडमाके यांचा ऐतिहासिक लढा वर्तमानातही प्रेरक बातम्या - Chandrapur

शहीद बाबुराव शेडमाके यांचा ऐतिहासिक लढा वर्तमानातही प्रेरक


- लेखिका उषाकिरण आत्राम यांचे प्रतिपादन : चंद्रपुरात प्रथमच रंगली गोंडियन संस्थेची अनोखी व्याख्यानमाला विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटिश सत्तेविरोधात दिलेला लढा केवळ ऐतिहासिक घटना नसून, तो आजच्या काळातही अन्याय व शोषणाविरुद्ध लढण्यासाठी अत्यंत प्रेरक आहे. गोंडवाना भूमीचा स्वाभिमान, जल-जंगल-जमिनीचे हक्क व आदिवासी संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ देता कामा नये. त्यांचा हा विद्रोही जागर नव्या पिढीला दिशा देणारा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका उषाकिरण आत्राम यांनी केले. गोंडियन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या वतीने रविवारी १ चंद्रपुरातील तुकूम येथील मातोश्री विद्यालय सभागृहात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके: गोंडवाना स्वाभिमानाचा विद्रोही जागर या विषयावर आयोजित व्याख्याना...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वेकोलि बाधित गावांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा : शुद्ध पाणी, रोजगार व दुष्काळग्रस्तांना मदतीचा मुद्दा ऐरणीवर बातम्या - Chandrapur

वेकोलि बाधित गावांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा : शुद्ध पाणी, रोजगार व दुष्काळग्रस्तांना मदतीचा मुद्दा ऐरणीवर


- वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक संजय मिश्रा यांच्याशी रघुवीर हं. अहीर यांची विविध जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : वेकोलि बाधित गावांतील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासह त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि गावांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने दि. ०२/११/२०२६ रोजी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष  रघुवीर हंसराज अहीर यांनी वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक संजय मिश्रा यांची भेट घेऊन विविध जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत बाधित गावांमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदत मिळण्याच्या विषयांवर विशेष भर देण्यात आला. यावेळी घुग्गुस चे नगरसेवक गणेश पिंपळकर, मयूर भोकरे, विशाल डामेर, रमण तांड्रा, शाम खेवले, गणेश मुसळ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नागरिकांच्या प्रश्नांवर निर्णय घेताना अनावश्यक विलंब नको : कालबद्ध कृती आराखडा तयार करा – आ. किशोर जोरगेवार बातम्या - Chandrapur

नागरिकांच्या प्रश्नांवर निर्णय घेताना अनावश्यक विलंब नको : कालबद्ध कृती आराखडा तयार करा – आ. किशोर जोरगेवार


- जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत ३४ महत्त्वपूर्ण विषयांचा आढावा; प्रलंबित वेतन, नजूल पट्टे, दुष्काळी उपाययोजना, सामाजिक कल्याण आणि शहर विकासाच्या प्रश्नांवर चर्चाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात आढावा बैठक घेतली. बैठकीत विविध विभागांशी संबंधित ३४ महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांचे प्रश्न, प्रलंबित वेतन, नजूल पट्टेवाटप, दुष्काळी उपाययोजना, सामाजिक कल्याण आणि शहरातील विकासकामांचा आढावा घेत आमदारांनी सर्व विभागांना कालमर्यादेत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.या बैठकीलास मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, घुग्घूस नगर पर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →