महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

खाजगी ट्रॅव्हल्सची मनमानी भाडेवाढ खपवून घेणार नाही : जादा भाडे आकारल्यास तक्रार करा बातम्या - Chandrapur

खाजगी ट्रॅव्हल्सची मनमानी भाडेवाढ खपवून घेणार नाही : जादा भाडे आकारल्यास तक्रार करा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी पाहून खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकिटांचे दर मनमानी पद्धतीने वाढविले जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभाग सतर्क झाला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कमाल भाडेदरापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या वाहतूकदारांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्यास त्यांनी गप्प न बसता परिवहन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.दिवाळी आणि इतर सणांच्या सुट्ट्यांमध्ये पुणे, नागपूर, अमरावती, हैदराबाद, यवतमाळ, नाशिक आदी शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या गर्दीचा फायदा घेत काही खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांकडून अवाजवी भाडे वसूल करतात. विशेषतः ऐन गर्दीच्या काळात प्रवाशांना पर्याय नसल्याने जाद...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नक्षलग्रस्त भागातून राष्ट्रीय अभिमानाच्या व्यासपीठापर्यंत : चंद्रपूरच्या ५० नागरिकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीचे विशेष निमंत्रण बातम्या - Chandrapur

नक्षलग्रस्त भागातून राष्ट्रीय अभिमानाच्या व्यासपीठापर्यंत : चंद्रपूरच्या ५० नागरिकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीचे विशेष निमंत्रण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कधीकाळी नक्षलवादाच्या सावटाखाली वावरणाऱ्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर राहिलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आता राष्ट्रीय सन्मानाचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ज्या भूमीने कधीकाळी अस्थिरतेचे दिवस अनुभवले, त्याच भूमीतील दुर्गम आणि संवेदनशील भागातील ५० नागरिकांना देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय एकता परेड सोहळ्यासाठी केंद्र शासनाने विशेष निमंत्रित केले आहे. हा केवळ गुजरात दौरा नसून चंद्रपूरच्या बदलत्या चेहऱ्याचा, शांततेच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाचा आणि विकासाच्या नव्या आशेचा राष्ट्रीय गौरव आहे.देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरातमधील एकतानगर (केवडिया) येथे भव्य राष्ट्रीय एकता परेड सोह...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
१७ महिन्यांनंतर वडिलांच्या खुनाचा उलगडा : मुलानेच गळा आवळून केली हत्या, विषप्राशनाचा रचला बनाव, आरोपी अटकेत बातम्या - Chandrapur

१७ महिन्यांनंतर वडिलांच्या खुनाचा उलगडा : मुलानेच गळा आवळून केली हत्या, विषप्राशनाचा रचला बनाव, आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कौटुंबिक वादातून जन्मदात्या वडिलांचाच गळा आवळून खून केल्यानंतर विषप्राशनामुळे मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना राजुरा तालुक्यातील धिडसी येथे उघडकीस आली आहे. वडिलांची हत्या करून त्यांच्या तोंडाला तणनाशक औषध लावून मृत्यूचे कारण लपविण्याचा प्रयत्न मुलाने केला होता. मात्र, व्हिसेरा तपासणी अहवाल आणि वैद्यकीय अभिप्रायामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी आरोपी मुलगा निखील शंकर काळे ३१ वर्ष , रा. धिडसी याला राजुरा पोलिसांनी अटक केली आहे.मृतक शंकर परशुराम काळे ५९ वर्ष  हे १९ मे २०२५ रोजी रात्री जागल करण्यासाठी चार्ली येथील स्वतःच्या शेतात गेले होते. त्याच दिवशी सायंकाळी घरातील सोन्याची गोप चोरी केल्याचा आरोप आई मंदा काळे यांनी मुलगा निखील याच्यावर केला होता. यावरून निखील आणि त्याच्या वडिलांमध्ये जोरदार वाद होऊन मारहाण झाली...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
इनरव्हील क्लबच्या डीसी व्हिजिटला उत्स्फूर्त प्रतिसाद बातम्या - Chandrapur

इनरव्हील क्लबच्या डीसी व्हिजिटला उत्स्फूर्त प्रतिसाद


- गरजू मुलांना स्कूल बॅग्स व खाऊचे वाटप; दोन नवीन सदस्यांचा क्लबमध्ये समावेशविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : इनरव्हील क्लब ऑफ वरोरा, डिस्ट्रिक्ट ३०३ ची डिस्ट्रिक्ट चेअरमन  मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत डीसी व्हिजिट उत्साहात संपन्न झाली. यावेळी डिस्ट्रिक्ट चेअरमन यांनी क्लबच्या विविध सामाजिक प्रकल्पांचा व कार्याचा आढावा घेत सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच आगामी प्रकल्पांसाठी उपयुक्त सूचना दिल्या. या भेटीदरम्यान दोन नवीन सदस्यांचा क्लबमध्ये समावेश करण्यात आला.सामाजिक बांधिलकी जपत क्लबच्या वतीने गरजू मुलांना स्कूल बॅग्स व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. कार्यक्रमाला रोटरी, रोटरॅक्टचे सदस्य तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला क्लबच्या अध्यक्षा स्नेहल पट्टीवार, उपाध्यक्षा प्रतिभा नेमानीवार, सचिव प्राजक्ता...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बहुजनांच्या हक्कांसाठी आता संघटित लढा उभारण्याची वेळ : कोजागिरी स्नेहमिलनातून एकजुटीचा संदेश बातम्या - Chandrapur

बहुजनांच्या हक्कांसाठी आता संघटित लढा उभारण्याची वेळ : कोजागिरी स्नेहमिलनातून एकजुटीचा संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : संविधानिक अधिकार, आरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी बहुजन समाजाने जात-पात आणि पोटजातींच्या भिंती ओलांडून एकत्र यावे. समाजातील विखुरलेपण दूर करून संघटित शक्ती निर्माण केल्याशिवाय आपल्या हक्कांचे संरक्षण शक्य नाही, असा सूर बहुजन विचार मंचाच्या विशेष कोजागिरी स्नेहमिलन सोहळ्यात उमटला. खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह विविध मान्यवरांनी बहुजन एकजुटीची आवश्यकता अधोरेखित केली.बहुजन विचार मंचाच्या वतीने आयोजित या स्नेहमिलन सोहळ्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देशातील आणि राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य केले. लोकशाही मूल्ये आणि संविधानिक अधिकारांसमोर आव्हाने निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व अधोरेखित केले. उद्या मत वाचले तरच देश आणि संविधान वाचेल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. आरक्षणाच...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
गोवंश व दारू तस्करीतील दोन सराईत गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार बातम्या - Chandrapur

गोवंश व दारू तस्करीतील दोन सराईत गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडपिपरी परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी गोंडपिपरी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली आहे. गोवंश तस्करी आणि अवैध दारू तस्करीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या दोघांना चंद्रपूर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.यामध्ये अशफाक मस्तान कुरेशी ४३ वर्षे रा. गोंडपिपरी हा सराईत गोवंश तस्कर असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (अ) व (ब) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव गोंडपिपरी पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची दखल घेत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी अशफाक कुरेशी याला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित केला. त्यानुसार पोलिसांनी आदेशाची बजावणी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण क...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन कारची चाके चोरली : रामनगर पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाला घेतले ताब्यात बातम्या - Chandrapur

कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन कारची चाके चोरली : रामनगर पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाला घेतले ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : स्वतःची कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन कारची चार-चार चाके अलॉयव्हीलसह चोरण्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये उघडकीस आला आहे. कार खरेदीसाठी कमी पडणारे पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने हवेली गार्डन परिसरातील एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. रामनगर पोलिसांनी त्याला पालकांसमक्ष ताब्यात घेत दोन्ही गुन्ह्यांची उकल केली असून, एकूण १ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.२१ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजेपासून २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंत नागपूर रोडवरील गॅरेजसमोर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या भूषण नारायणराव गवांडे यांच्या मारुती सुझुकी ब्रेझा कारचे चारही टायर अलॉयव्हीलसह काढून नेण्यात आले. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३१/२०२६ अन्वये ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
महिलेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला जन्मठेप : वरोरा सत्र न्यायालयाचा निकाल बातम्या - Chandrapur

महिलेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला जन्मठेप : वरोरा सत्र न्यायालयाचा निकाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वरोरा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सुनावण्यात आली. या प्रकरणात आरोपीला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार जन्मठेपेसह अतिरिक्त कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.२९ एप्रिल २०२१ रोजी संबंधित महिला आरोपीसोबत चारचाकी वाहनाने आपल्या वाढवणा या गावाकडे जात होती. मात्र, खैरी येथून वाढवणा येथे जाण्याऐवजी आरोपीने वाहन मावळी मार्गावरील नागरी मावळीपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर नेले. तेथे महिलेला धमकी देऊन मारहाण केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५३/२०२१ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३२३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्या...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
राजुरा–आसिफाबाद मार्गावर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू : एक जखमी बातम्या - Chandrapur

राजुरा–आसिफाबाद मार्गावर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू : एक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बकऱ्यांसाठी चारा आणण्याच्या निमित्ताने मित्रासोबत राजुरा येथे गेलेल्या तरुणावर गावाकडे परतताना काळाने घाला घातला. राजुरा–आसिफाबाद मार्गावरील सुमठाणा फाट्याजवळ नाल्याच्या पुलावर अज्ञात ट्रकने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुरेश वीरय्या येगेवार यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला रमेश ऊर्फ समीर प्रभाकर वेलादी (२२) हा जखमी झाला. २७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.बेडी भेंडाळा नवीन वस्ती, ता. राजुरा येथील रहिवासी सुरेश येगेवार हे मेंढ्या व बकऱ्या राखण्याचे काम करीत होते. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांनी रमेश वेलादी याला सोबत घेऊन राजुरा येथे जाण्याचे ठरविले. बकऱ्यांसाठी चारा आणण्याच्या उद्देशाने दोघेही सुरेश य...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दैनंदिन साफसफाई करीता निविदा आमंत्रित बातम्या - Chandrapur

दैनंदिन साफसफाई करीता निविदा आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथील कार्यालयीन इमारत, कार्यालयीन परिसर, प्रत्येक मजल्यावरील पुरुष व महिला प्रसाधनगृहांची दैनंदिन साफसफाई तसेच इत्यादी कामाकरिता मनुष्यबळ आणि साहित्य/ सामुग्री पुरविण्यासाठी सन २०२६-२७ या वर्षासाठी लिफाफा बंद निविदा मागविण्यात येत आहे.सेवा पुरवठा कंत्राटदार /सेवा संस्थांनी २५ नोव्हेंबर २०२६ पर्यत कार्यालयीन वेळेत दुपारी ३ वाजेपर्यत प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे निविदा सादर करावी. या संदर्भातील अटी व शर्ती तसेच इतर आवश्यक तपशील, निविदा फॉर्मवर कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहे व कार्यालयात उपलब्ध आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →