चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : ट्रान्सफॉर्म रूरल इंडिया फाउंडेशन, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या मिशन आनंदी (असंसर्गजन्य आजार कार्यक्रम) अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील ४ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले. या प्रशिक्षणात जवळपास २०० आशा वर्कर व गटप्रवर्तक सहभागी झाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोमल मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.उद्घाटन गटविकास अधिकारी संगीता भांगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी पुंडलिक पाल, आरोग्य विस्तार अधिकारी खामनकर, तालुका समूह संघटक आर. के. राठोड, समुदाय संघटन व आरोग्य तज्ज्ञ संदेश समुद्रे, जिल्हा असंसर्गजन्य रोग समन्वयक डॉ. पद्मजा बोरकर, जिल्हा कार्यक्...
बातम्या -
Chandrapur
- जंगलालगतच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे वन विभागाचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून, जंगलालगतच्या गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात मानवी हस्तक्षेपामुळे व त्यांच्यातील वाढत्या संपर्कामुळे अशा घटनांची शक्यता निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर जंगलालगतच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच व एफ.डी.सी.एम. आणि वन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सारंग बोधे यांनी केले आहे.अशी घ्या खबरदारी -१. जंगलात अनावश्यक प्रवेश टाळावा, वनक्षेत्रात जाणे आवश्यक असल्यास वन विभागाच्या नियमांचे व सूचनांचे पालन करावे, २. शेतीची कामे करताना सावधानता बाळगावी, जंगलालगतच्या ...
बातम्या -
Chandrapur
- सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष स्वच्छता व जनजागृती मोहीमविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार १ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ब्रिक्स सस्टेनेबल लाइफस्टाइल वीक साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मिशन लाईफ अभियानाच्या माध्यमातून ७ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये कचरा कमी करा ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे, कचऱ्याची निर्मिती कमी करणे तसेच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया याबाबत...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दिवाळीच्या पावन पर्वावर ग्रामीण महिलांच्या मेहनतीला, कौशल्याला आणि उद्योजकतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पंचायत समिती बल्लारपूरच्या प्रांगणात उमेद अभियानांतर्गत भव्य दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा, गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवात ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कोठारी येथील संजोग उत्पादक समूह, रमाई व निशा समूह, बामणी येथील समर्थ समूह तसेच विसापूर येथील वीरा समूहाने विविध खाद्यपदार्थ आणि आकर्षक सजावटीच्या वस्तूंचे स्टॉल लावले होते.या स्टॉलवर महिलांनी स्वतः तयार केलेले पारंपरिक दिवाळी फराळ, लाडू, चकली, चिवडा यांसह विविध खाद्यपदार्थ ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कोविड-१९ महामारीच्या संकटकाळात स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या घुग्घुस येथील ३२ आशा स्वयंसेविकांना अद्याप त्यांच्या हक्काची प्रोत्साहन रक्कम मिळालेली नाही. तब्बल पाच ते सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी आजपासून घुग्घुस येथील आठवडी बाजार रंगमंचावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.कोविड महामारीच्या काळात आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण, आरोग्यविषयक जनजागृती, माहिती संकलन तसेच आरोग्य विभागाने सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत पार पाडल्या. या कामाच्या मोबदल्यात दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे २४ महिन्यांची प्रोत्साहन रक्कम देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ दोन महिन्यांची रक्क...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत बहुजन समाज पक्षाच्या नगरसेविकेला अखेर स्वतंत्र केबिन उपलब्ध झाली आहे. प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका तथा बसपा गटनेत्या सोनिया प्रशांत उंदीरवाडे यांच्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुख्य कार्यालयाच्या तळमजल्यावर केबिन उपलब्ध करून दिली. या कार्यालयाचे ३ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर लोकसभा प्रभारी धर्मेश निकोसे होते. उद्घाटनप्रसंगी बसपाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे, लोकसभा प्रभारी तथा बल्लारपूर विधानसभा प्रभारी राजेश ब्राम्हणे, प्रशांत उंदीरवाडे आणि नगरसेविका सोनिया प्रशांत उंदीरवाडे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासह...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर पैशांचा जुगार खेळविण्याचा प्रकार आर्वी परिसरात सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच लाठी पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सात कोंबडे, १२ दुचाकी, चार कात्या आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकारात तीन कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास मौजा आर्वी गावाच्या मागे नाल्यालगत हा जुगार सुरू होता. लाठी उपपोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक मंजुळकर यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस पथक सहित घटनास्थळी धाड टाकली. यावेळी कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांचा डाव लावणारे इसम आढळून आले.पोलिसांनी घटनास्थळावरून प्रवीण सुरेश दरेकर ३५ वर्षे रा. शिवाजी वार्ड, राजुरा आणि प्रका...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले सुभाष तुराणकर आणि ईश्वर सुभाष तुराणकर यांनी पुन्हा शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे. भाजपला रामराम करीत माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेत घरवापसी केली.कोरपना येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले, तालुकाध्यक्ष ॲड. श्रीनिवास मुसळे, संघटनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मुसळे, रमा पाटील मालेकर, अनंताभाऊ गोडे, अविनाश मुसळे, नादिर कादरी, शारीक अली, संदीप टोंगे, गणेश तुराणकर, गणपत गोडे, प्रवीण रासपल्ले, सौरभ राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : अवघ्या सहा वर्षे अकरा महिन्यांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २६ वर्षीय आरोपीला चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. महेश गजानन मोहुर्ले २६ वर्ष असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.ही संतापजनक घटना १६ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यात घडली होती. अवघ्या सहा वर्षे अकरा महिन्यांची बालिका घराबाहेर खेळत असताना आरोपी महेश मोहुर्ले याने तिचा हात पकडून जबरदस्तीने स्वतःच्या घरात ओढून नेले. त्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.दरम्यान, बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी दरवाजा उघडून चिमुरडीची आरोपीच...
बातम्या -
Chandrapur
- २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान विविध जनजागृतीपर उपक्रम; चंद्रपूर महानगर भाजप कार्यालयात पदाधिकार्यांची बैठकविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणार्या लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी चंद्रपूर महानगर भाजप कार्यालयात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला उपस्थित राहून अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, महानगर प्रभारी अर्चना देहणकर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, ज्येष्ठ नेते विजय राउत, माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, महामंत्री रविंद्र गुरुनुले, मनोज पाल, नामदेव डाहुले, विधानसभा प्रमूख दशरथसिंह ठाकूर, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावक...