आमगाव येथे सलग २७ व्या वर्षी तिरंगा क्रिकेट क्लबच्या वतीने क्रिकेट स्पर्धा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / देसाईगंज : तालुका स्थळापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आमगाव येथे सलग २७व्या वर्षी तिरंगा क्रिकेट क्लबच्या वतीने क्रिकेट स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन २६ ऑक्टोबर रोजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. आमगावच्या सी. एम. क्रिकेट क्लबने प्रथम बक्षीस पटकावले. तिरंगा क्रिकेट क्लबने द्वितीय बक्षीस, तर तृतीय बक्षीस हे कुरुळ येथील स्व. अजय क्रिकेट क्लबने पटकावले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठीत नागरिक केवळराम घोरमोडे, अरविंद राऊत, रमेश ठाकरे, योगेश नाकतोडे, प्रभाकर चौधरी, लोमेश देशमुख, अमोल नाकाडे, सचिन फाये, सागर नाकाडे, विश्वेश्वर बेहरे, राजू बुल्ले, सोनल घोरमोडे, राजू कोल्हे, श्रीधर पाटील, तलाठी वनकर, माधवराव चंडीकार, विठ्ठल नखाते, अनिल निकम, डॉ. विवेक चव्हारे, मुख्याध्यापक नीलेश तितीरमारे, सतीश प्रधान, मुख्याध्यापक शेंदरे, घनश्याम लाडे, संपत कावळे, देवराव पाटील, शंकर वालदे, नानाजी कोल्हे व ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन धर्मराज घोरमोडे, तर आभार गजेंद्र काळबांधे यांनी मानले.
News - Gadchiroli