नागपूर येथे युवा गट प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : समाजकल्याण विभागाअंतर्गत २६ नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर हा कालावधी सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ०१ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात अनुसूचित जाती स्वयंसहायता युवा गट प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत एकूण २३ युवागटातील ११४ लोक उपस्थित होते. त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. बार्टीतर्फे हायटेक आणि ईडीपीच्या यशस्वी उद्योजकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटक समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले. युवागटातील लोकांना शासकीय योजनेतून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
समाजकल्याणच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी युवा पिढीने शासकीय नोकरीवर विसंबून न रहाता आपल्या आजूबाजुच्या उद्योगामध्ये लक्ष देऊन मोठा उद्योजक होण्याचा प्रयत्न साधावा, असे आवाहन केले. हेमंत वाघमारे, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नागपूर यांनी उद्योजकांना यशस्वी उद्योजक कसे घडावे याबाबत मार्गदर्शन केले.
मार्गदर्शक म्हणून भाग्यश्री शेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हृदय गोडबोले तर आभार प्रदर्शन सतीश सोमकुवर समतादूत यांनी केले.
News - Nagpur