महत्वाच्या बातम्या

 पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारला कॅलिफोर्नियात अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागील सूत्रधार गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. इंडिया टुडेने आपल्या एका वृत्तात हिंदुस्थानच्या गुप्तचर संस्थांच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणांना आंतरराष्ट्रीय स्त्रोतांकडून हे मोठे इनपुट मिळाले आहेत. मात्र, या प्रकरणी कॅलिफोर्निया सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. गुप्तचर विभाग RAW, IB, दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि पंजाब इंटेलिजन्सला गोल्डी ब्रार तेथे असल्याची निश्चित माहिती मिळाली आहे आणि त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदरजीत सिंग आहे. तो 28 वर्षांचा आहे. ब्रार याचा जन्म पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब येथे झाला असून तो हिंदुस्थानी नागरिक आहे. 2017 मध्ये तो शिक्षण घेण्यासाठी कॅनडाला आला होता. गोल्डीविरुद्ध हिंदुस्थानात खुनाचा प्रयत्न, खून, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर बंदुकांचा पुरवठा इत्यादी गंभीर आरोप दाखल आहेत. सिद्धू मूसेवाला याच्या हत्येमागे ब्रार हा मुख्य सूत्रधार असल्याचेही मानले जात आहे.

मुसेवाला हत्या प्रकरणाचे गूढ अद्यापही पूर्णपणे उलगडले नाही. या घटनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. कॅनडामध्ये बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रार हा मुख्य शूटरच्या सतत संपर्कात होता आणि तो त्याला सतत फोनवरून सूचना देत होता. यासंदर्भात फोनवरून झालेल्या संभाषणाचे काही रेकॉर्डिंग देखील समोर आले होते.





  Print






News - World




Related Photos