महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालयाची क्रीडा क्षेत्रात त्रिगुणी कामगिरी


- १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम, तर १४ व १९ वर्षांखालील गटात द्वितीय क्रमांक; एकूण २ लाख १९ हजार ४०० रुपयांचे पारितोषिक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोलीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सन २०२५-२६ मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यालयाने १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयाला एकूण ₹२,१९,४००/- चे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

सत्र २०२५-२०२६ मध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बेसबॉल, सॉफ्टबॉल, हँडबॉल, बॉल बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, थ्रो बॉल, फुटबॉल, ॲथलेटिक्स आणि बास्केटबॉल यांसह विविध सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर विद्यालयाने जिल्हा चॅम्पियन ट्रॉफीचा बहुमानही पटकावला.

विद्यालयाच्या या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द आणि शिस्तबद्ध सराव यांचा मोठा वाटा आहे. त्यासोबतच विद्यालयाचे क्रीडा प्रमुख भूपेंद्र चौधरी यांचे नियोजन व मार्गदर्शन तसेच सर्व क्रीडा प्रशिक्षकांचे सातत्यपूर्ण परिश्रम महत्त्वाचे ठरले.

शेषराज खेडकर हे बेसबॉल, सॉफ्टबॉल, हँडबॉल व बॉल बॅडमिंटनचे प्रशिक्षण देतात. प्रदीप राऊत हे व्हॉलीबॉल, खो-खो व कबड्डीचे प्रशिक्षण देतात. देशमुख सर हे थ्रो बॉल, कॅरम व बुद्धिबळाचे मार्गदर्शन करतात. टिकमचंद मंगम हे फुटबॉल व ॲथलेटिक्स, साहिल राऊत हे बास्केटबॉल, तर योगेश चव्हाण हे कराटेचे प्रशिक्षण देतात.

या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली भास्कर घटाले यांच्या हस्ते गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा सन्मान करण्यात आला. विद्यालयाच्या या यशामुळे गोंडवाना सैनिकी विद्यालयाने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या या त्रिगुणी क्रीडा यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. धर्मरावबाबा आत्राम, अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, क्रीडा प्रमुख भूपेंद्र चौधरी, सर्व क्रीडा प्रशिक्षक, शिक्षकवृंद आणि खेळाडू विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.





  Print






Related Photos