महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्यासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार बातम्या - Chandrapur

दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्यासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार


- चंद्रपूर जिल्ह्यातील ६० शाळा व वसतिगृहांमधील ८ हजार ७५० विद्यार्थ्यांची दंत तपासणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : दुर्गम, ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात विशेष मौखिक आरोग्य तपासणी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ६० शाळा व वसतिगृहांमधील तब्बल ८ हजार ७५० विद्यार्थ्यांची दंत व मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये दातांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच दंतविकारांचे वेळीच निदान करून आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला.जिल्हा मौखिक आरोग्य कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोना...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
पोलीस हवालदार महेश शिवरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन बातम्या - Chandrapur

पोलीस हवालदार महेश शिवरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कोठारी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार महेश शिवरकर (वय ४८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे पोलीस विभागासह त्यांच्या परिचितांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास जेवण करून ते झोपले होते. दरम्यान, त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याकरिता नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.महेश शिवरकर हे चंद्रपूर येथील नगीना बाग परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १२ वर्षीय मुलगा आणि आप्तपरिवार असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक निधनाने परिसरात शोककळा पसरली असून पोलीस विभागातूनही दुःख व्यक्त केले जात आहे.

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कान्पा जंगलात अवैध हातभट्टीवर पोलिसांची धाड; ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त बातम्या - Chandrapur

कान्पा जंगलात अवैध हातभट्टीवर पोलिसांची धाड; ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील कान्पा जंगल परिसरात अवैधरित्या हातभट्टीची मोहा दारू गाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागभीड पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून हातभट्टीवर सुरू असलेला अवैध दारू निर्मितीचा व्यवसाय उद्ध्वस्त केला. या कारवाईत ५६ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घटनास्थळावरून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणी राकेश अरुण करिये ३८ वर्षे व रोहित प्रकाश अलोने २८ वर्षे दोन्ही रा. कान्पा, ता. नागभीड, जि. चंद्रपूर  यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ब), (क), (ड) व (फ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कान्पा येथील जंगल परिसरात तलावाच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी आरोपी दगडांची चूल तयार करून त्यावर लोखंडी ड्रम...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
निवृत्तीवेतन धारकांनी घरबसल्या सादर करावे डिजिटल जीवन प्रमाणपत्र बातम्या - Chandrapur

निवृत्तीवेतन धारकांनी घरबसल्या सादर करावे डिजिटल जीवन प्रमाणपत्र


- १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पाचवी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीमविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन नियमितपणे मिळत राहावे, यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) सादर करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागामार्फत १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पाचवी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी जीवन प्रमाण प्रणालीद्वारे घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी संजय पडिशालवार आणि अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) स्वाती कुलकर्णी यांनी केले आहे.निवृत्तीवेतनधारकांना दरवर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
अज्ञात वाहनाच्या धडकेत मसण्या उद चा दुर्दैवी मृत्यू : वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर बातम्या - Chandrapur

अज्ञात वाहनाच्या धडकेत मसण्या उद चा दुर्दैवी मृत्यू : वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बाबुपेठ-जुनोना मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पाम सिव्हेट (मसण्या उद) या वन्यप्राण्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जंगलाकडे जात असताना  Habitat Conservation Society चे सदस्य यश सोनुले आणि कल्पित सोरटे यांना हा वन्यप्राणी रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. मात्र, उपचारासाठी हलविण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.अपघातात वाहनाचे चाक पाम सिव्हेटच्या तोंडावरून आणि पोटावरून गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने हा प्राणी रस्त्यावर वेदनेने तडफडत होता. संस्थेच्या सदस्यांनी तत्काळ त्याला उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर  येथे नेण्याकरिता वाहनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मदत पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती वनविकास महामंडळाल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
महिला पोलीस हवालदार सुषमा पवार यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव बातम्या - Chandrapur

महिला पोलीस हवालदार सुषमा पवार यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : पोलीस स्टेशन वरोरा येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार सुषमा पवार यांनी ऑक्टोबर २०२६ या महिन्यात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सुषमा पवार यांच्याकडे ऑक्टोबर महिन्यात पासपोर्ट पडताळणीसाठी एकूण ६२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यांनी हे सर्व अर्ज अत्यंत तत्परतेने आणि जबाबदारीने हाताळत निर्धारित २१ दिवसांच्या मुदतीपूर्वी पूर्ण केले.विशेष म्हणजे त्यांनी १०० टक्के कामकाज वेळेत पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेची आणि कार्यतत्परतेची दखल घेत पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट कामगिरी चे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कापूस वेचणी करताना वाघाचा अचानक हल्ला : शेतकरी गंभीर जखमी बातम्या - Chandrapur

कापूस वेचणी करताना वाघाचा अचानक हल्ला : शेतकरी गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतात कापूस वेचणीचे काम सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याने ५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता परिसरात घडली. सुनील मोतीराम कोडापे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सुनील कोडापे हे आठ ते दहा मजुरांसह मौजा चक कन्हळगाव येथील शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. सर्वजण कामात व्यस्त असताना अचानक वाघाने सुनील यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जवळच काम करणाऱ्या मजुरांनी आरडाओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर जखमी शेतकऱ्याला तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
भेसळीच्या संशयावरून ३६ लाखांचे अन्नपदार्थ जप्त : एफडीएची धडक कारवाई बातम्या - Chandrapur

भेसळीच्या संशयावरून ३६ लाखांचे अन्नपदार्थ जप्त : एफडीएची धडक कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविली आहे. या मोहिमेदरम्यान भेसळीच्या संशयावरून तब्बल ३६ लाख रुपये किमतीचा ८ हजार ९८८ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. खाद्यतेल, खवा, मिरची पावडर, हळद, धने पावडर, विविध मसाले, गूळ, शेंगदाणे आणि चहा पावडर आदी पदार्थांचा यात समावेश आहे.सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने ९२ आस्थापनांची तपासणी करून १७० अन्ननमुने विश्लेषणासाठी घेतले. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्याने ५१ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या. यापैकी १० आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले. तसेच भेसळीच्या संशयावरून १५ प्रकरणांत अन्नपदार्थांचा स...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
तेलंगणातील रुग्णालयातून लाखोंचे व्हेंटिलेटर लंपास : चंद्रपूर एलसीबीने आरोपीला केले जेरबंद बातम्या - Chandrapur

तेलंगणातील रुग्णालयातून लाखोंचे व्हेंटिलेटर लंपास : चंद्रपूर एलसीबीने आरोपीला केले जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील राजीव गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था (रिम्स) शासकीय रुग्णालयातून लाखो रुपये किमतीचे चार व्हेंटिलेटर चोरीला गेल्याच्या घटनेचा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या चोरीप्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला चंद्रपुरातून ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.३० ऑक्टोबर २०२६ रोजी आदिलाबाद येथील रिम्स शासकीय रुग्णालयातील आरआयसीयू तसेच सारी आणि टीबी वॉर्डमधून प्रत्येकी १५ लाख रुपये किमतीचे चार व्हेंटिलेटर चोरीला गेले होते. या चारही व्हेंटिलेटरची एकूण किंमत सुमारे १ कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या घटनेप्रकरणी आदिलाबाद-२ टाऊन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२)...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
लाड-पागे वारसा हक्क नियुक्तीचा मार्ग मोकळा : चंद्रपूर मनपातील १४७ वारसांना नियुक्ती देण्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश बातम्या - Chandrapur

लाड-पागे वारसा हक्क नियुक्तीचा मार्ग मोकळा : चंद्रपूर मनपातील १४७ वारसांना नियुक्ती देण्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश


- आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; सफाई कुली व सफाई रेजा यांनाही सफाई कामगारांचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क तत्त्वावर नियुक्ती देण्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी यासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चंद्रपूर महानगरपालिकेतील १४७ वारसांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या वारसांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.लाड-पागे समितीच्या शिफारशी आणि सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियु...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →