भामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायतीवर ध्वजारोहणाआधीच नक्षल्यांनी फडकवला काळा झेंडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
देशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना जिल्ह्यात नक्षल्यांच्या कुरापती सुरू असल्याचे दिसून आले आहे. तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायतीवर नक्षल्यांनी ध्वजारोहणाआधीच काळा झेंडा फडकाविल्याचे निदर्शनास आले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आरेवाडा ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी तोरण बांधून ध्वजारोहणाची तयारी करण्यात आली होती. मात्र नक्षल्यांनी रात्रीच काळा झेंडा फडकवून ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावर बॅनर बांधल्याचे आढळून आले आहे. बॅनरमधून स्वातंत्र्य दिनाचा नक्षल्यांनी निषेध केला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-15


Related Photos