महत्वाच्या बातम्या

 सर्वोदय विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती; विद्यार्थ्यांना संकटसमयी सुरक्षिततेचे धडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आपत्ती कोणत्याही क्षणी उद्भवू शकते. अशा परिस्थितीत घाबरून न जाता प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेणे आणि स्वतःसह इतरांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने सर्वोदय विद्यालय, बल्लारपूर येथे ३ ऑक्टोबर रोजी आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वया कार्यक्रमात गुंजन राम यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगत नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भूकंप, आग, पूर, अपघात यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण कसे करावे, संकटाच्या वेळी कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि मदत मिळेपर्यंत परिस्थितीचा सामना कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

आपत्तीच्या प्रसंगी भीती किंवा अफवांना बळी न पडता शांत राहणे, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून योग्य निर्णय घेणे आणि उपलब्ध साधनांचा सुरक्षितपणे वापर करणे यावरही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध बाबी जाणून घेतल्या.
विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच संकटाच्या प्रसंगी आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने वागण्याची क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम माहितीपूर्ण व उपयुक्त ठरला. कार्यक्रमाला सर्वोदय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  विद्या गजभे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.





  Print






Related Photos