महत्वाच्या बातम्या

 महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी ज्ञान उजळणी परीक्षा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सूचनेनुसार महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी यशवंत महाविद्यालय येथे ज्ञानाची उजळणी परीक्षा घेण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी स्वत: परिक्षा केंद्रावर उपस्थित होते. यशवंत महाविद्यालयातील 7 वर्ग खोल्यांमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेदरम्यान प्रत्येक वर्गखोल्यामध्ये 7 उपजिल्हाधिकारी यांची पर्यंवेक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस महसूल विभागातील जिल्हाभरातील 38 विविध स्तरावरील अधिकारी तर 118 कर्मचारी असे एकुण 156 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर परिक्षेच्या दुपारच्या सत्रात विकास भवन येथे परीक्षेत घेण्यात आलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी होऊन सकारात्मक चर्चा केली.





  Print






News - Wardha




Related Photos