सुभाष वार्डात टॉवर उभारणीला नागरिकांचा तीव्र विरोध : मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील सुभाष वार्ड परिसरात टॉवर उभारणीचे काम सुरू असताना स्थानिक नागरिकांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. परिसरातील नागरिकांनी एकत्र येत टॉवर उभारणीला आक्षेप नोंदवित नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
टॉवर उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना होणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे आपली बाजू मांडली. नागरिकांच्या आक्षेपांची दखल घेऊन संबंधित विषयाची पाहणी व आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या वेळी नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, गटनेते करीम शेख, नगरसेवक भास्कर माकोडे, इस्माइल ढाकवाला, अविनाश मठ्ठा नगरसेविका करुणा रेब्बावार, चेतन गेडाम यांच्यासह शमशेर निषाद, राजू निषाद, हीरा बहुरिया, कल्लू यादव, गोलू बहुरिया, छोटन निषाद, संतोष माहेश्वरी, नरसिंग रेब्बावार, संजय झिल्लेवार, सीनू रेब्बावार, जगदिश कडू, अमर निषाद, मुन्ना मोरया, सजु निषाद, गंगा निषाद, साई सदाला, सौरभ धरनिवार, पूनम बहुरिया, मिथलेशा निषाद, बबलू बहुरिया, नितीन बहुरिया, बबलू बामना, रूपेश रामटेके आणि सुनील मोतीलाल यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.




Petrol Price




