महत्वाच्या बातम्या

 SIR प्रक्रियेसह पदवीधर मतदार नोंदणीला प्राधान्य द्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक राजुरा क्लब सभागृहात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी काळातील पक्षसंघटनेची दिशा, जनहिताचे प्रश्न आणि विविध संघटनात्मक उपक्रमांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत SIR प्रक्रियेला गती देणे, पदवीधर मतदारांची नोंदणी प्रभावीपणे पूर्ण करणे, जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर लोकशाही मार्गाने आंदोलने यशस्वी करणे तसेच बूथपातळीपासून काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपल्या कार्यक्षेत्रात जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. तसेच काँग्रेसची विचारधारा व जनकल्याणकारी भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, अशा सूचना माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिल्या.

यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे, ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, रंजन लांडे, डॉ. अंकुश गोतावळे, उपनगराध्यक्ष संजय मेंढी, सभापती संतोष इंदूरवार, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधु यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीला विकास देवाळकर, सचिन भोयर, गणेश गोडे, अभिजीत धोटे, तुषार बावणे, जंगू पाटील येडमे, भाऊराव चव्हाण, धनराज चिंचोलकर, अब्दुल जमीर, संतोष महाडोळे, अविनाश जेनेकर, रामभाऊ ढुमणे, प्रा. आशिष देरकर, अभय मुनोत, इर्शाद शेख, अशोक राव, कोमल फुसाटे, शैलेश लोखंडे, उमेश राजुरकर, आशिष नलगे, कवडू सातपुते, सिताराम मडावी, ताजुद्दीन शेख, योगेश पट्टेवाले, साजिद शेख, उत्तम कराळे, किशोर बानकर, सय्यद साबिर, मधुकर झाडे, मुरलीधर बल्की, तिरुपती पोले, दत्ता तोगरे, विजय राठोड, रामदास पंधरे, रविंद्र कुमनकर, अमित टेकाम, आदित्य गोडे यांच्यासह विविध फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos