महत्वाच्या बातम्या

 महिला पोलीस हवालदार सुषमा पवार यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : पोलीस स्टेशन वरोरा येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार सुषमा पवार यांनी ऑक्टोबर २०२६ या महिन्यात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सुषमा पवार यांच्याकडे ऑक्टोबर महिन्यात पासपोर्ट पडताळणीसाठी एकूण ६२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यांनी हे सर्व अर्ज अत्यंत तत्परतेने आणि जबाबदारीने हाताळत निर्धारित २१ दिवसांच्या मुदतीपूर्वी पूर्ण केले.

विशेष म्हणजे त्यांनी १०० टक्के कामकाज वेळेत पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेची आणि कार्यतत्परतेची दखल घेत पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट कामगिरी चे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!





  Print






Related Photos