चामोर्शी - आष्टी मार्गावरील ‘ते’ अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरच, - दोन्ही बाजूस लागल्या जडवाहनांच्या रांगा


- वाहने काढण्यासाठी केली जात आहे कसरत
- पुन्हा अपघाताचा धोका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / येनापूर
: नेहमीच वर्दळ राहणाऱ्या चामोर्शी - आष्टी मार्गावर डम्पर वाहून नेत असलेल्या ट्रेलरवरून डम्पर खाली कोसळल्याची घटना काल १६ आॅगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. यामुळे वाहतूक ठप्प पडली.  हे अपघातग्रस्त  वाहन अजूनही हटविण्यात आले नसल्यामुळे दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून पुन्हा अपघाताचा धोका बळावला आहे.
ट्रेलरवरून वाहून नेणारे डम्पर अचानक रस्त्यावर कोसळले. यावेळी सुदैवाने जिवीतहाणी झाली नाही. मात्र दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी अडकून पडली आहेत. यामुळे रस्त्याच्या बाजूने लहान वाहनधारक आपली वाहने काढत आहेत. पावसामुळे प्रचंड चिखल निर्माण झाला आहे. यामुळे अडथळ्यांमधूनसुध्दा काही वाहनधारक वाहने काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.  
दरम्यान चामोर्शी - आष्टी मार्गावरून येणारी काही वाहने घोट मार्गे वळविण्यात आली आहेत. तर बसेस, छोटी वाहने लक्ष्मणपूर - जैरामपूर मार्गे वळविण्यात आली आहेत. या अपघाताने वाट अडवून धरली असल्यामुळे रापमच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेसुध्दा हाल होत आहेत. यामुळे वाहने त्वरीत हटविण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-17


Related Photos