महत्वाच्या बातम्या

 आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांकरीता शिकाऊ भरती मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहून आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या विविध ट्रेडसाठी शिकाऊ पदासाठी मुलाखती घेणार आहे. यासाठी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी मेळाव्यात उपस्थित राहावे, असे आवाहन मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे.
मेळाव्यात ई.पी.ई.ई. प्रॉडक्शन वर्धा, आय.एम.इंजिनियरिंग वर्क्स, अवचट ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज, ट्रांन्सरेल लाईटिंग लि. देवळी, सेवा ॲटोमोटीव्ह लिमिटेड, दत्ता मेघे इंस्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स वर्धा आदी कंपनी मध्ये कारपेंटर, फिटर, ईलेक्ट्रीशियन, वेल्डर, कोपा, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, मशिनिष्ट, रेफिजरेशन ॲन्ड एअरकंडीशनींग ट्रेडसाठी कंपनीमध्ये शिकाऊ पदभरती उमेदवार निवड करण्यात येणार आहे, असे मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राने कळविले आहे.

  Print


News - Wardha
Related Photos