मुंबईतील क्रिस्टल टॉवरला भीषण आग, श्वास गुदमरून चौघांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
परळ भागातील क्रिस्टल टॉवरला भीषण आग लागली आहे. या आगीच्या धुरामुळे श्वास गुदमरून चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यात एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. इमारतीत अडकलेल्या अनेक नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आणखी काही लोक आत अडकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवळपास २० बंबांनी आग विझवण्याचे काम केले. त्यामुळे सुमारे दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाल्याची माहिती मिळाली आहे. या १४ मजली टॉवरच्या १२ व्या मजल्यावर ही आग लागली होती. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-08-22


Related Photos