महत्वाच्या बातम्या

 सिगारेट ओढण्यास विरोध केला म्हणून वाद : पतीला मर्डरची धमकी, महिलेवर विटेचा घाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : घरासमोर येऊन पतीला मर्डर करतो अशी धमकी देणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेवर विट फेकून हल्ला करण्यात आल्याची घटना विसापूर येथे १२ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेत महिलेच्या कपाळावर तसेच डाव्या डोळ्याखाली दुखापत होऊन रक्तस्राव झाला. वर्षा विजय गिरडकर (४४), रा. साईबाबा मंदिराजवळ, वॉर्ड क्र. ५, विसापूर यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, विधिसंघर्षग्रस्त बालक हा त्यांच्या घराशेजारील पडीत घराजवळ सिगारेट ओढण्यासाठी नेहमी येत होता. त्यामुळे वर्षा यांनी यापूर्वीही त्याला तेथे येऊ नये, असे बजावले होते.

१२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास तो त्यांच्या घरासमोर आला. त्याने वर्षा यांच्या पतीला तुझा मर्डर करतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. पतीने जाब विचारला असता संबंधित बालक मारण्यासाठी पुढे येत असल्याचे पाहून वर्षा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी विधिसंघर्षग्रस्त बालकाने दोघांना शिवीगाळ केली आणि कथितरित्या विट फेकून वर्षा यांच्या दिशेने मारली. विट त्यांच्या कपाळावर तसेच डाव्या डोळ्याखाली लागल्याने त्या जखमी झाल्या.

घटनेच्या वेळी रामकृष्ण सरोदे आणि शंकर शेंडे उपस्थित होते. त्यांनी मध्यस्थी करून वाद सोडविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वर्षा गिरडकर यांच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अजय झाडे करीत आहेत.





  Print






Related Photos