महत्वाच्या बातम्या

 स्वामी नरेंद्रचार्य यांच्या पादुका पूजन दर्शन सोहळ्याने भक्तगणांच्या गर्दीने देसाईगंज नगरी दुमदुमली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देसाईगंज : जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळाने देसाईगंज नगरी भाविकांच्या गर्दीने दुमदुमली असुन लाटाई माता मंदिर वीर्शी वॉर्ड देसाईगंज येथून शोभा यात्रा निघाली. याप्रसंगी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 10 नोव्हेंबर 2022 रोजी स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुकांची भव्य शोभायात्रा निघाली शोभायात्रेत हजारो भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होऊन भव्य मिरवणूक व फटाक्यांची आतिषबाजी करत विर्शि वॉर्ड ते गांधी चौक मार्गे बस स्थानक आणि थेट क्रीडासंकुल स्टेडियम, देसाईगंज येथे शोभायात्रा येऊन भक्तगण स्थानापन्न झाले. यानंतर पादुकांची महाआरती करण्यात आली. पादुका दर्शन सोहळा निमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम मंडळातर्फे घेण्यात आले.कार्यक्रमा प्रसंगी आमदार गजबे म्हणाले की, जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने देसाईगंज नगरी मध्ये स्वामी नरेंद्रचार्य महाराजांच्या पादुका दर्शन सोहळ्याने देसाईगंज नगरी ही भक्तगणांच्या गर्दीने दुमदुमली आहे. स्वामी नरेंद्रचार्य महाराजांच्या सान्निध्यामुळे व आशीर्वादामुळे अनेक पीडितांचे दुःख दूर झाले आहे. त्यासोबत महाराजांच्या सान्निध्यामुळे व्यसन मुक्त झालेले लाखो भावीक या महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. म्हणूनच नरेंद्र स्वामी महाराजांच्या पादुका दर्शन सोहळ्याचं महत्त्व शिक्षणाच्या जीवनात आहे. आणि म्हणून आपण नरेंद्र महाराजांनी दिलेली शिकवण अंगीकारावी असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले. यावेळी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते दुर्बल घटकांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, किसन नागदेवे भाजपा जिल्हाध्यक्ष, मोतीलाल कुकरेजा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, शालू दंडवते नगराध्यक्ष न. प. देसाईगंज, नंदू नरोटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos