चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नगर परिषद बल्लारपूरच्या अधिनस्त प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद २१ ऑगस्ट रोजी पीएम श्रीनगर परिषद गांधी विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. अलका वाढई होत्या. कार्यक्रमाला बल्लारपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सचिन मालवी, शिक्षण सभापती कु. प्रियंका थुलकर, उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार, शिक्षण सल्लागार नागेश नीत, गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन कडूकर, गडचिरोलीचे उपक्रमशील शिक्षक सुधीर गोहणे, समूह समन्वयक माया वाटोरे, वैशाली धार्मिक, केंद्रप्रमुख श्रीनिवास रायला, सुदाम राठोड व अमोल टोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.या शिक्षण परिषदेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अध्ययन अनुभवांचे आदान-प्रदान, शिक्षकांच...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूरद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची तसेच भारतीय क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची माहिती देण्यात आली. त्यानंतर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.या स्पर्धेत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे एकूण सात संघ सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा डॉ बालमुकुंद...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कुचना परिसरात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर माजरी पोलिसांनी धाड टाकून चार जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, पत्ते आणि तीन अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ८९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना २८ ऑगस्ट रोजी रात्री गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास मौजा कुचना, समृद्धी वसाहत परिसरात छापा टाकला. यावेळी चार इसम गोलाकार बसून ३२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावत जुगार खेळताना आढळून आले.पोलिसांनी जुगाराच्या डावावरील २ हजार ८०० रुपये रोख, पत्ते, आरोपींच्या अंगझडतीत मिळालेले ६ हजार ५०० रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले तीन अँड्रॉइड मोबाईल, किंमत ८० हजार रुपये, असा एकूण ८९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला. या प्रकरणी अमित मानिकराव परचा...
बातम्या -
Chandrapur
- मेत्ताशा इंडेन गॅस एजन्सीच्या कारभारावर ग्राहकांचा संताप; कार्यालयासमोर मोठी गर्दी, रांगेत ग्राहकाला भोवळविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी घेऊनही ग्राहकांना प्रत्यक्ष सिलिंडर न देणे, महिनाभरापेक्षा अधिक काळ ग्राहकांना प्रतीक्षा करायला लावणे, घरपोच डिलिव्हरीचे शुल्क वसूल करूनही ग्राहकांना एजन्सीच्या कार्यालयाचे खेटे घालायला लावणे तसेच कनेक्शन हस्तांतरणात अडवणूक करणे, अशा प्रकारांच्या तक्रारींमुळे गडचांदूर येथील मेत्ताशा इंडेन गॅस एजन्सीच्या कारभाराविरोधात ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्यांमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी शुक्रवारी २८ एजन्सीच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली. सिलिंडरसाठी रांगेत ताटकळत उभे असताना एका ग्राहकाला अचानक भोवळ आली आणि तो खाली कोसळल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.ओटीपी घेतला; मात्र...
बातम्या -
Chandrapur
- ब्रह्मपुरी, सावली व गोंडपिंपरी तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर दारू पुरवठा होत असल्याच्या तक्रारी , सीमावर्ती भागातील कथित तस्करीकडे यंत्रणांचे दुर्लक्ष -राजेश भोजेकरविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : एका बाजूला १९९३ पासून दारूबंदी असलेला गडचिरोली जिल्हा आणि दुसऱ्या बाजूला दारू विक्रीला परवानगी असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्ती तालुके. या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमारेषेवरून वाहणारी वैनगंगा नदी आणि तिच्या परिसरातील ग्रामीण रस्ते यांचा कथित दारू तस्करीसाठी गैरफायदा घेतला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. विशेषतः ब्रह्मपुरी, सावली आणि गोंडपिंपरी तालुक्यांतील काही सीमावर्ती भागांतून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूचा पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यामागे व्यसनमुक्त समाजाची निर्मिती हा प्रमुख उद्दे...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गोवंशाची अमानुष व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मूल पोलिसांनी धडक कारवाई करत २४ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली आठ बोलेरो पिकअप वाहने जप्त करण्यात आली असून, एकूण ४५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मूल पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मौजा बॅबाळ चौकीसमोरील रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान आठ बोलेरो पिकअप वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये एकूण २४ गोवंश जनावरांची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था न करता तसेच त्यांना वेदना होतील अशा पद्धतीने वाहतूक केली जात होती. ही जनावरे कत्तल व विक्रीच्या उद्देशाने नेली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.या कारवाईत ५ लाख ५५ हजा...
बातम्या -
Chandrapur
- जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना शिष्टमंडळाचे निवेदन; सार्वजनिक सुविधांसाठी जमिनीचा वापर करण्याचा प्रस्तावविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेता बल्लारपूर शहराच्या विकासासाठी उपलब्ध असलेली जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे बल्लारपूर पेपर मिलची शासनजमा झालेली १९.४३ हेक्टर जमीन नगर परिषदेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बल्लारपूर चे नगराध्यक्षा अल्का अनिल वाढई यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्षा छाया मडावी आणि नगरसेवक भास्कर माकोडे यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट घेतली. यावेळी जमिनीच्या हस्तांतरणासंदर्भात निवेदन देण्यात आले.बल्लारपूर शहराच्या एका बाजूला नदीचे क्षेत्र, तर दुसऱ्या बाजूला वनक्षेत्र आहे. तसेच काही भाग ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बँकेतून घरगुती कामासाठी काढून आणलेली तब्बल दोन लाख रुपयांची रोकड दुचाकीच्या डिकीत ठेवणे एका ७८ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले. अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डिकीतून दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी राजुरा शहरात घडली. प्राप्त माहितीनुसार, अशोक रामचंद्र बोधे ७८ वर्षे रा. मशीद वॉर्ड, शिवशंकर किराणा स्टोअरसमोर, राजुरा हे नगरपरिषद राजुरा येथून सेवानिवृत्त झाले आहेत. घरगुती गरजेसाठी पैशांची आवश्यकता असल्याने ते २७ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता राजुरा येथील CDCC बँकेत गेले होते. तेथून त्यांनी आपल्या खात्यातून दोन लाख रुपये रोख काढले.बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ही संपूर्ण रोकड आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीच्या डिकीत ठेवली. त्यानंतर ते पेट्रोल पंपासमोरील पंचर दुकानात गेले. तेथून नगरपालिका परिसर...
बातम्या -
Chandrapur
- चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; ₹५ हजार दंडाचीही शिक्षाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : अल्पवयीन पीडितेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस चंद्रपूर येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सक्षम कारावास आणि रु.५ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीस अतिरिक्त एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (II) अन्वये आरोपीस २ वर्षांचा सक्षम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.पीडितेने आईकडे सांगितला प्रकार -सदर घटना २८ फेब्रुवारी २०२३ रोजी उघडकीस आली. पीडितेच्या घराजवळ राहणारा आणि पीडिता ज्याला मामा म्हणत होती, त्या आरोपीकडून पीडितेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात येत असल्याची बाब तपासात समोर आली. पीडितेच्या आईने तिच्याकडे विचारणा केल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत घडल...
बातम्या -
Chandrapur
- अस्वच्छता, बंद एसी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीवर नाराजी , रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्याच्या कडक सूचनाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध समस्या आणि रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. पाहणीदरम्यान काही ठिकाणी आढळलेली अस्वच्छता, बंद असलेले एसी, कर्मचाऱ्यांची कर्तव्यावरील गैरहजेरी तसेच रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील स्वच्छता, सुरक्षितता आणि सेवा व्यवस्था तातडीने सुधारण्याच्या कडक सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. रुग्णालयातील स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी स्वच्छता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असली पाहिजे. त्यामुळे...