महत्वाच्या बातम्या

 आंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नाशिक : सध्या आजूबाजूला अनेक घटना या घडत असतात. खासकरून लहान मुलांच्या बाबतीत अनेक गोष्टी घडताना दिसत आहे. नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बाथरूममध्ये अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा (Girl) मृत्यू झालाय. नाशिकच्या गंगापूर नाका भागात घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. आहे. आवेरा शुभम इंगळे असे मृत बलिकेचे नाव आहे. आवेराच्याच्या अंगावर पाणी सांडल्यानंतर ती गंभीर रित्या भाजली होती तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

सध्या अशाप्रकारे अनेक धक्कादायक गोष्टी घडताना दिसत आहेत. अशावेळी आपल्या लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलांचे आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या तान्ह्या बाळांकडे आवर्जून लक्ष द्या. अशाप्रकारे जर तुम्ही तुमच्या मुलांची व्यवस्थित काळजी घेतलीत तर तुम्हाला अशा तऱ्हेच्या अनेक वाईट घटनांपासून तुम्ही वाचू शकता. लहान मुलांच्या शेजारी शक्यतो कुठलीच गरम वस्तू ठेवू नका. त्यासोबत कुठल्याच प्रकारे इलेक्ट्रिक वस्तूही ठेवू नका. आपल्या लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपल्याच हातात आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos