महत्वाच्या बातम्या

 पुण्यातील अधिवेशनात जेष्ठ पत्रकार खासदर कुमार केतकर यांच्या हस्ते अनिल वाघमारे यांचा गौरव


- डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्यध्यक्षपदी नियुक्ती बद्दल केले अभिनंदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषदेचाच एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेची नवीन विंग सुरू केली असून या डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्याध्यक्ष पदी बीड जिल्ह्याचे सुपूत्र आणि डोंगरचा राजा या चॅनलचे संपादक अनिल वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर पुण्यातील मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात जेष्ठ पत्रकार खा. कुमार केतकर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करुन निवडीबद्दल गौरव करण्यात आला.

याबाबत अधिक वृत्त असे की, मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन परिषदेचे नेते, मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस.एम.देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य अध्यक्ष शरद पाबळे यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर, माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार अँड. अशोक पवार, न्युज अँकर विलास बडे, अश्विन बापट, रेश्मा साळुंखे, अनुपमा खानविलकर, निकीता पाटील, तर समारोपप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार रोहित पवार, आमदार आदिती तटकरे, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. समीरण वाळवेकर, सकाळचे संपादक सम्राट फडणविस, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवी आंबेकर, ज्येष्ठ संपादक तुळशीदास भोईटे तसेच राजकीय, पत्रकारिता, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक वरीष्ठ मान्यवरांची या राष्ट्रीय अधिवेशनास उपस्थिती लाभली. येत्या काळात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेचे कामकाज एकजुटीने व अधिक जोमाने करण्यासाठी पुढील दोन वर्षांसाठी संपादक अनिल वाघमारे यांची राज्याच्या कार्यध्यक्ष पदी निवड केली आहे. महाराष्ट्र राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा सुरू करण्यात आलेले आहे. युट्यूब चॅनल्स, पोर्टल च्या संपादकांना डिजिटल मिडिया परिषदेचे सदस्य करून घेतले जात असून दोन हजारांवर डिजिटल पत्रकार परिषदे बरोबर जोडले गेले आहेत. उर्वरित जिल्ह्यात डिजिटल मिडियाच्या शाखा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याची जबाबदारी संपादक अनिल वाघमारे यांच्यावर सोपविली गेली आहे. सर्व जिल्ह्यात शाखा सुरू झाल्यानंतर राज्य कार्यकारिणी सुध्दा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी स्पष्ट केले आहे. अनिल वाघमारे गेले २० वर्षे पत्रकारितेत आहेत. डोंगरचा राजा हे वर्तमानपत्र आणि युट्यूब चॅनल ते वडवणी येथून चालवत असतात. ग्रामीण भागातील पत्रकारास राज्याचे नेतृत्व करण्याची संधी प्रथमच मिळत आहे. जेष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी अनिल वाघमारे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिले आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos