महत्वाच्या बातम्या

 दिव्यांग व्यक्तीसाठी सामाजिक सुरक्षेंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाकडून दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाचा सहज स्विकार, त्यांना प्राप्त होणारे कौटुंबिक, भावनिक, मानसिक आणि सामाजिक स्थैर्य विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत १) दिव्यांग अव्यंग व्यक्तीच्या विवाहकरीता १ लक्ष ५० हजार रुपये तर दिव्यांग-दिव्यांग व्यक्तीच्या विवाहकरीता २ लक्ष ५० हजार रुपये देण्यात येते.

पात्रता निकष : १) वधु अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियम प्रमाणे किमान ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधारसंलग्न वैध ओळखपत्र आवश्यक. २) दिव्यांग वधु अथवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. ३) विवाहित वधु व वराचा प्रथम विवाह असावा तसेच वधु अथवा वर घटस्पोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी. ४) विवाह हा कायदेशीररीत्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. ५) विवाह झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे दिव्यांग सहायक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे : आधारसंलग्न वैध वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पती व पत्नीच्या आधारसंलग्न संयुक्त बँक खात्याचा सविस्तर तपशील (बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, वयाचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला, परिशिष्ट-अ, परिशिष्ट ब, घोषणा पत्र.

सदर योजनेचा जिल्ह्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.





  Print






Related Photos