महत्वाच्या बातम्या

 राज्यस्तरीय ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धेकरीता गडचिरोली संघ रवाना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

प्रतिनिधी / गडचिरोली : २० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२२ दरम्यान होणाऱ्या १६ वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धेकरीता गडचिरोली जिल्हा संघ रवाना झाला आहे. संघात संबोधी मुन, अनुष्का कोकोडे, भाव्या म्हस्के, विधी लोंढे, गुंजन पळशीकर, सिध्दी सेठी, राशी कराडे, देविका देव्हारे, मृणाली भोगे, अग्रिमा चीलमवार, स्वराली कोल्हटवार यांचा समावेश आहे. तसेच प्रशिक्षक अंकित ढोके, सहप्रशिक्षक साहिल राऊत, सहप्रशिक्षिका अश्विनी म्हस्के संघासोबत रवाना झाले आहे. संघाला अनील तिडके यांनी किटचे वितरण केले तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी दोंदल,अजय सेठी यांनी संघाला शुभेच्छा दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos