राजोली येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
- आमदार डॉक्टर देवरावजी होळी
- क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा आहे भारत मातेचे महान सुपुत्र
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जुलमी, अत्याचारी इंग्रजी राजवटीला उलथून लावण्यासाठी आदिवासी समाज बांधवांना संघटित करून इंग्रजी राजवटीच्या विरोधात लढा देणारे भगवान बिरसा मुंडा हे भारत मातेचे महान सुपुत्र असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी राजुरी येथील भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना आमदार डॉक्टर देवराव होळी म्हणाले की, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या २५ वर्षाच्या अल्पावधी आयुष्यामध्ये इंग्रजांना सडो की पळो करून सोडले. त्यांच्या या लहान आयुष्याच्या काळात त्यांनी केलेली कामगिरी अत्यंत उच्च दर्जाची आहे. इंग्रजी जुलमी अत्याचारी राजवटीला उलथून लावण्यासाठी त्यांनी केलेले महान कार्य हे कोणीही विसरू शकणार नाही असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
News - Chandrapur