महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

शासकीय शाळा, वसतिगृहांच्या सुविधांबाबत युवासेना आक्रमक बातम्या - Chandrapur

शासकीय शाळा, वसतिगृहांच्या सुविधांबाबत युवासेना आक्रमक


- स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅडसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील शासकीय शाळा तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅड नॅपकीन तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे आणि युवासेना चंद्रपूर विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या मार्गद...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चंद्रपूरमध्ये सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवांचा शुभारंभ बातम्या - Chandrapur

चंद्रपूरमध्ये सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवांचा शुभारंभ


- ICMR पडोली येथे कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर युनिट व प्रीनेटल डायग्नोसिस सुविधा सुरू- ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना तपासणी, निदान, समुपदेशन आणि उपचारासाठी होणार मोठा फायदाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सिकलसेल व थालेसेमियासारख्या अनुवंशिक रक्तविकारांनी ग्रस्त रुग्णांना दर्जेदार, वेळेवर आणि जवळच्या ठिकाणी आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने चंद्रपूर जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ICMR, पडोली येथे सिकल सेल डिसीज (SCD) आणि थालेसेमिया रुग्णांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर युनिट (CCU) आणि प्रीनेटल डायग्नोसिस (PND) या महत्त्वपूर्ण आरोग्यसेवांचा शुभारंभ करण्यात आला.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या आरोग्यसेवांचे उद्घाटन करण्यात आले. या ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ऐकोणा कोळसा खाणीतील ब्लास्टिंगमुळे घरांना तडे : नुकसानभरपाईची मागणी, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा बातम्या - Chandrapur

ऐकोणा कोळसा खाणीतील ब्लास्टिंगमुळे घरांना तडे : नुकसानभरपाईची मागणी, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा


- उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार व आमदारांना नागरिकांचे निवेदन; प्रभावित भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याची मागणीविदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / वरोरा : ऐकोणा कोळसा खाणीत करण्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील आणि तीव्र ब्लास्टिंगमुळे वरोरा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरांना व मालमत्तेला नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ब्लास्टिंगमुळे निर्माण होणाऱ्या तीव्र कंपनांमुळे घरांच्या भिंती, छत आणि इतर बांधकामांना भेगा पडत असून, घरातील साहित्याचेही नुकसान होत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे ब्लास्टिंगची तीव्रता तातडीने कमी करून नुकसानग्रस्त नागरिकांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या मागणीसाठी शेख जैरुदीन छोटू शेख, माजी सभापती, वरोरा तथा सदस्य, जिल्हा शांतता समिती, चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी संबंध...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विशाखापट्टणम येथील चिमुकल्याच्या मृत्यूनंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील मानसिक-शारीरिक दबाव थांबविण्याची मागणी बातम्या - Chandrapur

विशाखापट्टणम येथील चिमुकल्याच्या मृत्यूनंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील मानसिक-शारीरिक दबाव थांबविण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विशाखापट्टणम येथे वर्गात शिक्षकाने सहा वर्षीय चिमुकल्याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत बल्लारपूर तालुक्यातील प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांशी प्रेमाने व संवेदनशीलतेने वागण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.लहान मुलांवर अभ्यासाचा अनावश्यक ताण देणे, अभ्यास केला नाही म्हणून मारहाण करणे, मस्ती केली म्हणून मोठ्याने ओरडणे, त्यांच्या वयाच्या तुलनेत जड दप्तर देणे तसेच शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षा करणे, अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याऐवजी प्रेमाने समजाव...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नागभीडात चौघांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ एकच बातम्या - Chandrapur

नागभीडात चौघांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ एकच


- जनकापूर-चिंधी माल घटनांमधील अंतर केवळ ७ ते ८ किमी; नागरिकांमध्ये दहशत, हिंस्र वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / नागभीड : नागभीड वनपरिक्षेत्रात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पाच महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात चौघांचा बळी गेल्याने वनविभागाच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, जनकापूर आणि चिंधी माल येथे झालेल्या दोन हल्ल्यांमधील अंतर अवघे ७ ते ८ किलोमीटर असल्याने या दोन्ही शेतकऱ्यांचा बळी घेणारा वाघ एकच असावा, अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे.एवढेच नव्हे, तर एप्रिलपासून नागभीड वनपरिक्षेत्रात झालेल्या चारही मानवी हल्ल्यांमागे एकाच हिंस्र वाघाचा हात असावा, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. मात्र, नागभीड तालुक्यात वाघांची संख्या मोठी असल्याने चार...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
रविवारी रिपरिप जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी बातम्या - Chandrapur

रविवारी रिपरिप जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी


- सोयाबीन, कापूस, धान उत्पादकांना दिलासा; जलसाठे अद्याप तहानलेलेचविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रविवारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतशिवारात ओलावा निर्माण झाला असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सोयाबीन, कापूस आणि धान उत्पादकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, पावसाचे प्रमाण अद्याप समाधानकारक नसल्याने नदी-नाले, तलाव आणि जलसाठे पूर्णपणे भरलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने अनेक भागांतील पिके पावसाच्या प्रतीक्षेत ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
मुर्सा-देऊरवाडा-माजरी रस्त्याची अक्षरशः चाळण बातम्या - Chandrapur

मुर्सा-देऊरवाडा-माजरी रस्त्याची अक्षरशः चाळण


- चारगाव, कुनाडा परिसरातील नागरिक त्रस्त , कोळसा खाण कामगारांचीही होतेय परवडविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / भद्रावती : भद्रावती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील महत्त्वाचा मुर्सा-देऊरवाडा-माजरी मार्ग सध्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. अवघ्या सहा वर्षांपूर्वी, म्हणजेच सन २०१९-२० मध्ये बांधण्यात आलेल्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, त्याची सद्यस्थिती वाहनचालकांसाठी धोकादायक ठरली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे चारगाव, कुनाडा, एकतानगर यासह परिसरातील हजारो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.माजरीहून भद्रावती शहराकडे जाण्यासाठी हा मार्ग कमी अंतराचा आणि सोयीचा असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करतात. मात्र, ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे, उखडलेला रस्ता आणि खराब झालेला पृष्ठभाग यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे अनेक नागरिक...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपुरात जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद बातम्या - Chandrapur

बल्लारपुरात जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


- १८५ खेळाडूंचा सहभाग, विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल, विसापूर येथे आयोजित सहाव्या जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेचा दोन दिवसीय सोहळा उत्साहात पार पडला. २२ व २३ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत बल्लारपूर, चंद्रपूर, राजुरा आणि गडचिरोली येथील विविध शाळांमधील तब्बल १८५ खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना नगराध्यक्ष अल्का वाढई, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ अनिल वाढई तसेच माजी नगराध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजेत्या तसेच सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल क्रीडा भवितव्यासाठी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
CEIR पोर्टलच्या मदतीने मूल पोलिसांनी शोधले २२ हरवलेले मोबाईल बातम्या - Chandrapur

CEIR पोर्टलच्या मदतीने मूल पोलिसांनी शोधले २२ हरवलेले मोबाईल


- सायबर सेलच्या तांत्रिक तपासातून सहा मोबाईल हस्तगत; संबंधित तक्रारदारांना केले परतविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी हरवलेले अथवा गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून काढण्यासाठी पोलिसांनी Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर केला. CEIR पोर्टल आणि सायबर सेल, चंद्रपूर यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तांत्रिक तपासातून नुकतेच सहा हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. हे सर्व मोबाईल संबंधित सहा तक्रारदारांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत करण्यात आले.सन २०२६ मध्ये आतापर्यंत मूल पोलिसांनी एकूण २२ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढून ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत.मूल पोलीस ठाण्यात नागरिकांनी मोबाईल हरवल्याबाबत दिलेल्या तक्रारी व नोंदींच्या आधारे संबंधित मोबाईलचे IMEI क्रमांक CEIR पोर्टलवर न...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपुरात जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद बातम्या - Chandrapur

बल्लारपुरात जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


- १८५ खेळाडूंचा सहभाग, विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल, विसापूर येथे आयोजित सहाव्या जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेचा दोन दिवसीय सोहळा उत्साहात पार पडला. २२ व २३ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत बल्लारपूर, चंद्रपूर, राजुरा आणि गडचिरोली येथील विविध शाळांमधील तब्बल १८५ खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना नगराध्यक्ष सौ. अल्का वाढई, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ अनिल वाढई तसेच माजी नगराध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजेत्या तसेच सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल क्रीडा भवितव्या...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →