गडचिरोली जिल्हाचा एनएक्यूयूआयम अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : येथिल जिल्हाधिकारी कार्यालय कॉन्फरन्स हॉल मध्ये 10 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्याचा एनएक्यूयूआयम अहवाल यशस्वीरित्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांच्याकडे प्रस्तुत करण्यात आले. सदर अहवाल केंद्रीय भूमिजल बोर्डमध्ये क्षेत्र नागपूरचे वैज्ञानिक अश्विन आटे व अभय निवासकर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सदर अहवालाचे कौतुक केले. आणि अहवाल जलसंधारण आराखडा तयार व अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी संजय मीना यांनी नदीच्या पाण्याचा उपयोग करून शेती करण्यावर जास्त भर दिला. सदर बैठकीत जीएसडीए चे भूजल वैज्ञानिक उपस्थित होते. व अहवालाची प्रत जिल्हाधिकारी व जीएसडीएच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
News - Gadchiroli