महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठात शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांच्या करीता दोन दिवसाचे व्यावसायिक प्रशिक्षण


- विद्यार्थी व अभ्यागतांना दर्जात्मक सेवा द्यावी, डॉ.अमृत बंग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिलेली चांगली वागणूक ही लॉन्ग टर्म असते. आपण समस्या मांडणारे नाही तर समाधान करणारे असायला हवे. आणि त्यांना दर्जात्मक सेवा द्यायला हवी असे प्रतिपादन सर्चचे संचालक डॉ. अमृत बंग यांनी केले. गोडवाना विद्यापीठात प्रथमच व्यावसायिक शिक्षण नीती अंतर्गत शिक्षकत्तर अधिकारी व  कर्मचाऱ्यांकरता दोन दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्ष तसेच नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. सदर प्रशिक्षण राज्यातील अग्रगण्य संस्था मिटकॉन सल्लागार व अभियांत्रिकी सेवा संस्था पुणे यांच्या द्वारे घेण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , मार्गदर्शक म्हणून मिटकॉन तर्फे कौशल्य विभागाचे उपाध्यक्ष राजेश मिश्रा व वरिष्ठ प्रशिक्षक ,उप्पल सिन्हा उपस्थित होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाकडे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, शिक्षकेतर कर्मचारी हा विद्यापीठाचा कणा आहे. चांगली सेवा देण्याचं काम ते करत असून शिक्षण हे  आपल्यामध्ये  आधीपासूनच असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण आहे. त्यामुळे सदर व्यवसायिक प्रशिक्षण आहे त्या ज्ञानाला प्रगत करावयाचे एक माध्यम आहे. आपल्या प्रास्थाविकात  नवोपक्रम नवसंशोधन व सहचार्य चे संचालक प्रा. मनीष उत्तरवार म्हणाले, कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा पाया म्हणजे त्यांचे मनुष्यबळ असते व ते दोन प्रकारचे असते एक शिक्षक व दुसरे शिक्षकेत्तर कर्मचारी जे नेहमी शिक्षक वर्गाकरिता आवश्यक साह्यकाच्या भूमिकेत असतात. त्यामुळे विद्यापीठाला दर्जात्मक सेवा प्रदान करायची असेल तर अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक, शैक्षणिक व कौशल्य विकास या बाबींकरिता विद्यापीठाचे हे प्रशिक्षण महत्वाचे आहे असे ते म्हणाले. या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा  समारोप नुकताच पार पडला. सदर प्रशिक्षण शिबिरात मिटकॉन तर्फे कौशल्य विभागाचे उपाध्यक्ष राजेश मिश्रा व वरिष्ठ प्रशिक्षक उप्पल सिन्हा यांनी मार्गदर्शन केले. संचालन नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य चे प्रा.मनिष उत्तरवार यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.





  Print






News - Gadchiroli




Related Photos