हे फक्त आईच करू शकते....!


- गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पहायला मिळाले अनोखे मातृप्रेम 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
अजय कुकडकर / गडचिरोली :
‘आई’ या शब्दामध्येच ईश्वराचे रूप लपलेले आहे. असे म्हणतात की, देवाने जगाची काळजी घेण्यासाठी आई ही एक महान विभूती धरतीवर निर्माण केली. सर्वांची निःस्वार्थ भावनेने काळजी घेणारी व्यक्ती फक्त आईच असूू शकते. मग ती जनावरे सुध्दा का असेनात. ममता ही मानव, प्राणी अशा सर्वांना मिळालेली अनमोल भेट आहे. उन्ह, वारा, पाऊस, रात्र - दिवस एक करून आपले बाळ सुखरूप रहावे यासाठी ती सर्वांशी लढायला तयार असते. असाच काहीसा प्रसंग आज गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पहावयास मिळाला.
गडचिरोली शहरात  मोकाट जनावरांची संख्या मोठी आहे. ही जनावरे कधी रस्त्यावर, कधी शासकीय कार्यालयांच्या आवारात, कधी शहरातील रिकाम्या जागेत जे मिळेल ते पोटात टाकून भरकटतांना दिसून येतात. अनेक गायी, म्हशी, डूकरे तसेच अन्य प्राणी रस्त्यावर, झाडाझूडूपात किंवा इतरत्र आपल्या वासरांना, पिल्लांना जन्म देतात. मात्र कुठेही असतांना आपल्या पिल्लाची काळजी घेण्यात कोणतीही कमतरता भासू देत नाही.
सध्या पावसाने उसंत दिली आहे. यामुळे उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. दुपारच्या सुमारास उन्हाची तिव्रता मोठ्या प्रमाणात राहत आहे. पारा ३० अंश सेल्सिअसच्या वर पोहचत आहे. यामुळे सर्वांच्याच अंगाची लाहीलाही होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एक गाय आपल्या वासरासह भरकटत होती. मात्र उन्हामुळे वासराची अवस्था घायाळ झाली होती. वासरू मटकन खाली बसला. वासराची झालेली घायाळ अवस्था बघून गायीची ममता जागृत झाली आणि ती वासला आपल्या पोटाखाली छायेत घेण्यासाठी त्याच्याजवळ उभी झाली. यामुळे वासराला ममतेची छाया मिळाली. हा प्रसंग अनेकांनी याची देही याची डोळा अनुभवला.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-12


Related Photos