महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक कारागीर व शिल्पकारांना त्यांच्या पारंपरिक व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य, आधुनिक साधने, प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राबविण्यात येत आहे.

तसेच मेळाव्यास प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी उपस्थित राहणार असून, कार्यक्रमादरम्यान निवडक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत टूलकिट (साहित्य संच) तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र व बँक कर्ज मंजुरी पत्र सहपालकमंत्री आशिष जयस्वाल व जिल्हाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येणार असून, योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या टूलकिट व कर्ज सुविधांबाबत माहिती देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिक कारागीर व शिल्पकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी, पारंपरिक कारागीर व शिल्पकार तसेच संबंधितांनी या मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने करण्यात येत आहे.





  Print






Related Photos