नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेड फायद्यात, महिन्याकाठी एक कोटी ७५ लाखांचे उत्पन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
:  भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल आणि  लॅन्डलाईन सेवा संपूर्ण राज्यात तोट्यात असली तरी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात फायद्यात आहे. गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएल  प्रथम क्रमांकावर असून महिन्याकाठी एक कोटी ७५ लाखाचे उत्पन्न आहे. 
  गडचिरोलीत ३ लाख ४७ हजार बीएसएनएल मोबाईल ग्राहक आहेत. त्याच्या पाठोपाठ ४ हजार लॅन्डलाईन कनेक्शन आहेत. २२०० ब्रॉडबॅन्ड कनेक्शन आहेत. महिन्याकाठी १ कोटी ७५ लाखाचे उत्पन्न आहे. गडचिरोली पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्हय़ातही बीएसएनएल आघाडीवर आहे. गडचिरोली नक्षलवादग्रस्त जिल्हा असल्याने मोबाईल फोन सेवा ठप्प करण्यासाठी नक्षलवादी टॉवर जाळपोळ करतात. मात्र, या घटना कमी झाल्यामुळे बीएसएनएलचे नुकसानही कमी झाले आहे. अशी माहिती  बीएसएनएलच्या  अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
 चंद्रपूर जिल्ह्यात २००६ मध्ये बीएसएनएलचे सर्वाधिक ६० हजार लॅन्डलाईन फोन होते, परंतु आज केवळ १३ हजार ६१८ लॅन्डलाईन फोन आहेत. गेल्या बारा वर्षांत ४५ लॅन्डलाईन फोन बंद झाले. चंद्रपूर जिल्हय़ाचे २००६ मध्ये बीएसएनएलचे वार्षिक उत्पन्न ४० कोटी होते. आज केवळ २० कोटी आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी ते २६ ते २८ कोटी होते. आज बीएसएनएलचे ५ हजार ९६२ ब्रॉडबॅन्ड कनेक्शन आहेत. १ लाख ५४ हजार १२७ मोबाईलधारक असून यामध्ये १ लाख ५० हजार ८७३ प्रिपेड तर ३ हजार २५४ पोस्टपेड मोबाईलधारक आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-02


Related Photos