महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

विश्वासघात करून सोन्याची चैन लंपास; तांत्रिक तपासातून आरोपीपर्यंत पोहोचले मुल पोलीस : एकाला अटक, मुख्य संशयित फरार बातम्या - Chandrapur

विश्वासघात करून सोन्याची चैन लंपास; तांत्रिक तपासातून आरोपीपर्यंत पोहोचले मुल पोलीस : एकाला अटक, मुख्य संशयित फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राजगड येथील ६७ वर्षीय महिलेच्या घरातून चोरीस गेलेली सुमारे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन मूल पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे हस्तगत केली आहे. या प्रकरणात चोरीचा मुद्देमाल खरेदी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून, मुख्य संशयित फरार आहे. राजगड, ता. मूल येथील रहिवासी वंदना प्रेमानंद सोरते यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. डाव्या डोळ्याने कमी दिसत असल्याने त्या २६ जून रोजी उपचारासाठी गडचिरोली येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची नात व तिचा पती तथागत निमगडे हे त्यांच्या सोबत राहत होते. उपचारानंतर त्या घरी परतल्यानंतर निमगडे हा वडिलांची प्रकृती खराब असल्याचे सांगून पत्नीसमवेत आपल्या गावी निघून गेला.दरम्यान, २७ जून रोजी सोरते यांनी घरातील दागिन्यांची डबी तपासली असता त्यामध्ये ठेवलेली सुमारे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आढळून आली नाही. त्य...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांची मुस्लिम कमिटीसोबत बैठक बातम्या - Chandrapur

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांची मुस्लिम कमिटीसोबत बैठक


- जुलूसचा मार्ग, सहभागींची संख्या व सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा; शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आगामी २६ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद-उन्नबी सणाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन सुरू करण्यात आले आहे. याच अनुषंगाने २२ ऑगस्ट रोजी बल्लारपूर व विसापूर येथील मुस्लिम कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेण्यात आली.बल्लारपूर पोलीस ठाण्यात आयोजित या बैठकीस जामा मस्जिद कमिटी बल्लारपूरचे अध्यक्ष उस्मान गुलजार शेख, नगर सेवक इस्माईल ढाकवाला यांच्यासह शहरातील विविध मस्जिद कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या जुलूसच्या मार्गाबाबत, जुलूसमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या संभाव्य संख्येबाबत तसेच आवश्यक सुरक्षा व्यवस्थेबाबत पोल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नऊ महिन्यांच्या गर्भवतीचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांकडून हलगर्जीपणाचा आरोप बातम्या - Chandrapur

नऊ महिन्यांच्या गर्भवतीचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांकडून हलगर्जीपणाचा आरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पार्वती राजेंद्र गुप्ता ३० वर्ष रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर, असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी उपचारातील हलगर्जीपणाचा आरोप करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पार्वती गुप्ता या गेल्या काही महिन्यांपासून नियमित वैद्यकीय तपासणी व उपचार घेत होत्या. प्रसूतीची वेळ जवळ आल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना रक्त चढविण्यात येत होते. रक्त चढवित असताना पार्वती यांना अचानक थंडी वाजत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातड...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सिंदेवाहीत कोहळी समाजाचा भव्य लोकप्रतिनिधी मेळावा : चार जिल्ह्यांतून प्रचंड उपस्थिती बातम्या - Chandrapur

सिंदेवाहीत कोहळी समाजाचा भव्य लोकप्रतिनिधी मेळावा : चार जिल्ह्यांतून प्रचंड उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : कोहळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व औद्योगिक विकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सिंदेवाही येथे कोहळी समाजाचा भव्य लोकप्रतिनिधी मेळावा शनिवार २२ आगस्ट रोजी उत्साहात पार पडला. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या चारही जिल्ह्यांतून प्रचंड संख्येने समाजबांधव उपस्थित राहिले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते होते. यावेळी कोहळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, पद्मश्री परशुराम खुणे, दिवाकर निकुरे, गंगाधर परशुरकर, अमोल मुंगमोडे, चामेश्वर गहाने, नाना नाकाडे, सदानंद बोरकर, कांचन गहाने, ललित बालबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती.मेळाव्यात प्रथम समाज, नंतर पक्षधोरण या भूमिकेला प्राधान्य देत समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पक्षीय विचार व...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
आदिवासी काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्षपदी : गीताताई सलामे यांची नियुक्ती बातम्या - Chandrapur

आदिवासी काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्षपदी : गीताताई सलामे यांची नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी गीताताई  सुरेश सलामे रा. नवरगाव तालुका सिंदेवाही जि. चंद्रपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्या आदिवासींच्या  शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक मूलभूत संविधानिक हक्क व अधिकारासाठी तसेच आदिवासींवरील अन्याय अत्याचारा विरुद्ध संघर्षमय  लढा निर्भयपणे निरंतर  लढत असतात.त्यांच्यातील जिद्द चिकाटी आणि काँग्रेसच्या सद विवेक विचारांचा आदर्श व एकनिष्ठपणा  या गोष्टींमुळे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी गीताताई सलामे यांचेवर विश्वास ठेवून त्यांची महिला आदिवासी काँग्रेसच्या चंद्रपूर  जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.गीताताई सलामे यांची शिफारस आदिवासी काँग्रेसचे प्रदेश जनरल ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
मुख्याध्यापकांच्या तक्रारीनंतर १४ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या : चंद्रपुरात खळबळ बातम्या - Chandrapur

मुख्याध्यापकांच्या तक्रारीनंतर १४ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या : चंद्रपुरात खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शाळेच्या भिंतीवर मजकूर लिहिल्याच्या कारणावरून मुख्याध्यापकांनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर अवघ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २२ ऑगस्ट रोजी चंद्रपूर शहरात घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कु. तनिष्का गाडगे १४ वर्षे ही चंद्रपूर शहरातील एका नामांकित शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. शाळेच्या भिंतीवर तिने काही मजकूर लिहिल्याचे मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर मुख्याध्यापकांनी तिच्या पालकांकडे या प्रकाराची तक्रार केली. यानंतर आई-वडिलांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली. संबंधित विषयावर चर्चा झाल्यानंतर पालक मुलीसह घरी परतले.त्यानंतर काही वेळाने तिचे आई-वडील कामानिमित्त न्यायालयात गेले असताना विद्यार्थिनी घरीच होती. पालक घराबाहेर गेल्यानंतर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
गोंडपिंपरी पोलिसांची दमदार कामगिरी : चोरीचा २.४० लाखांचा मुद्देमाल फिर्यादींच्या स्वाधीन बातम्या - Chandrapur

गोंडपिंपरी पोलिसांची दमदार कामगिरी : चोरीचा २.४० लाखांचा मुद्देमाल फिर्यादींच्या स्वाधीन


विदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : पोलीस स्टेशन गोंडपिंपरीच्या हद्दीत चोरीस गेलेले १४ मोबाईल फोन व एक दुचाकी वाहन असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी तपासादरम्यान हस्तगत करून संबंधित फिर्यादींच्या ताब्यात परत केला.गोंडपिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी चोरीस गेलेल्या मोबाईल फोन व दुचाकी वाहनाबाबत दाखल तक्रारींचा पोलिसांनी तपास सुरू केला होता.तपासादरम्यान पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले. त्यामध्ये १४ मोबाईल फोन व एका दुचाकीचा समावेश आहे. हस्तगत करण्यात आलेला एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रविवार, २३ ऑगस्ट रोजी संबंधित फिर्यादींच्या ताब्यात परत करण्यात आला.गोंडपिंपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी कार्यक्षम तपास करून चोरीचा मुद्देमाल शोधून काढल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
इनर व्हील क्लब ऑफ वरोरा तर्फे मोफत हिमोग्लोबिन, CBC व शुगर तपासणी शिबिर बातम्या - Chandrapur

इनर व्हील क्लब ऑफ वरोरा तर्फे मोफत हिमोग्लोबिन, CBC व शुगर तपासणी शिबिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : इनर व्हील क्लब ऑफ वरोरा, डिस्ट्रिक्ट 303 तर्फे समाजातील नागरिकांसाठी मोफत CBC व शुगर तपासणी व गरजुंना औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर डॉ. साक्षी उपलेंचवार यांच्या सद्गुरू क्लिनिक येथे आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये समाजातील नागरिकांची हिमोग्लोबिन तपासणी, CBC टेस्ट तसेच शुगर टेस्ट करुण गरजुंना औषध वाटप करण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबिराच्या आयोजनापासून ते तपासणीच्या संपूर्ण व्यवस्थेपर्यंतची सर्व जबाबदारी व नियोजन डॉ. साक्षी उपलेंचवार यांनी सांभाळले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडले.या उपक्रमातून नागरिकांमध्ये नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न कर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
इनर व्हील क्लब ऑफ वरोरा तर्फे मोफत हिमोग्लोबिन, CBC व शुगर तपासणी शिबिर बातम्या - Chandrapur

इनर व्हील क्लब ऑफ वरोरा तर्फे मोफत हिमोग्लोबिन, CBC व शुगर तपासणी शिबिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : इनर व्हील क्लब ऑफ वरोरा, डिस्ट्रिक्ट ३०३ तर्फे समाजातील नागरिकांसाठी मोफत CBC व शुगर तपासणी व गरजुंना औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर डॉ. साक्षी उपलेंचवार यांच्या सद्गुरू क्लिनिक येथे आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये समाजातील नागरिकांची हिमोग्लोबिन तपासणी, CBC टेस्ट तसेच शुगर टेस्ट करुण गरजुंना औषध वाटप करण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.शिबिराच्या आयोजनापासून ते तपासणीच्या संपूर्ण व्यवस्थेपर्यंतची सर्व जबाबदारी व नियोजन डॉ. साक्षी उपलेंचवार यांनी सांभाळले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडले.या उपक्रमातून नागरिकांमध्ये नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर बॅचला भावपूर्ण निरोप बातम्या - Chandrapur

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर बॅचला भावपूर्ण निरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईच्या बल्लारपूर आवारातील २०२३–२०२६ या कालावधीतील पहिल्या पदवीधर बॅचचा निरोप समारंभ २१ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे बल्लारपूर आवाराच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित झाला.कार्यक्रमाला बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी पदवीधर विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मार्गदर्शन करताना डॉ. राजेश इंगोले यांनी बल्लारपूर आवाराच्या पहिल्या पदवीधर बॅचचे कौतुक केले. आवाराच्या उभारणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनी आता...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →