भामरागड तालुक्यातील १२८ गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला


- चारही बाजूंनी पाणीच पाणी
- कुठे नाला तर कुठे नदीने अडविली वाट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

मनिष येमुलवार / भामरागड : छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून असलेल्या व महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील भामरागड तालुक्याला दरवर्षीच पावसाळ्यात बेटाचे स्वरूप येते. पुरामुळे जगाशी संपर्क तुटतो. आता दोन दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे तालुक्याला चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढले असून तब्बल १२८ गावांचा तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे.
भामरागड तालुक्यात पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती या तिन नद्यांचा संगम आहे. पामुलगौतम नदीत पाणी तास्त झाले की पर्लकोटा नदीला दाब येतो. यामुळे भामरागडमध्ये प्रवेश करण्यासाठी महत्वाचा असलेला पुल पाण्याखाली जातो. एवढेच नाही तर भामरागडमध्ये पुराचे पाणी शिरते. शासनाने या पुलाच्या वाढीकरीता कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. यामुळे समस्या दूर होणार कशी हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कुठे नाल्याला आलेल्या पुरामुळे तर कुठे नदीच्या पुरामुळे तब्बल १२८ गावांची वाट अडविली आहे. या सर्व गावातील नागरिकांना अत्यावश्यक सोयी - सुविधांसाठी केवळ भामरागड येथेच यावे लागते. आरोग्याच्या कोणत्याही सुविधा गावांपर्यंत पोहचलेल्या नाहीत. शासकीय कामे, आपात्कालीन रूग्णसेवा कोणत्याही सेवा नाहीत. यामुळे पुरपरिस्थितीत बिकट वाट शोधायची कसा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुलांची उंची वाढविण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून आहे मात्र लक्ष देण्यासाठी कुणालाही वेळ नाही. पर्लकोटा नदीचे पाणी शहरात शिरते यामुळे नागरिक, दुकानदारांची चांगलीच फजीती होते. काही सामान पाण्यात वाहून जाते तर काही नासाडी होते. यामुळे मोठ्या नुकसानास पुढे जावे लागत आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-12


Related Photos