गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड


- वृषभ बावणे आणि झरण्या भषाखेत्री यांची क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथील दोन विद्यार्थ्यांनी कॅरम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. विद्यालयाचा विद्यार्थी वृषभ बावणे (इयत्ता ९ वी, ब) याची १७ वर्षांखालील मुलांच्या गटातून, तर झरण्या भाषखेत्री (इयत्ता १० वी) याची १९ वर्षांखालील गटातून राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात भर पडली आहे. कॅरमसारख्या खेळामध्ये एकाग्रता, अचूकता, संयम, रणनीती आणि निर्णयक्षमता या गुणांना विशेष महत्त्व असते. या गुणांच्या बळावर विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळविली आहे.
या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे आणि पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले.कोच कैलाश उपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
वृषभ बावणे आणि झरण्या भाषाखेत्री यांच्या या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करावी आणि विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.




Petrol Price




