महत्वाच्या बातम्या

 जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : २२ नोव्हेंबर २०२२ रोजी नरखेड पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, मोहदी दळवी रोड ०२ किमी उत्तर या मार्गांवर काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने काढुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती धरुन २२ नोव्हेंबर २०२२ चे ७६.४० वा. ते ०५.२० वा. चे सुमारास मोदी, दळवी रोड ०२ किमी उत्तर येथे नरखेड पोलीस पथकाने नाकाबंदी केली असता यातील बोलेंगे पिकअप वाहन क्रमांक एम. पि./ २८ जी. - ३५७६ चा चालक आरोपी मंशाराम ग्यानसिंग मेहदोले, (३३) रा. राजना, पोस्ट उभेगाव ता. जि. छिंदवाडा याने त्याचे नाव्यातील वाहनात तिन म्हशी व दोन रेडयाना पायाला गळयाला तोंडाला व शिंगाना दोरी बांधुन त्यांना ईजा पोहचवुन, गुदमरून मरतील अशा प्रकारे वाहतुक करतांना मिळून आल्याने यातील फिर्यादी व पोलीस स्टेशन नरखेड पोलीस पथकाने पेट्रोलींग दरम्यान सदर वाहनाचा पाठलाग करीत असता यातील वाहन चालकाने आपले ताब्यातील वाहन सदर वाहनाची पाहणी केली असता, तिन काळ्या रंगाच्या म्हशी प्रत्येकी किमती १५हजार प्रमाणे ४५ हजार रू व दोन रेडे प्रत्येकी १० हजार प्रमाणे २० हजार रूपये व बोलेरो वाहन किमती ३ लाख रूपये असा एकूण ३ लाख ६५ हजार रूपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून मिळुन आला. सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे - सहायक फौजदार शैलेश डोंगरदिवे, बन १५९८ पो.स्टे. नरखेड वांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन नरखेड येथे आरोपीविरुद्ध कलन ११ (१) (ड) प्रा.नि.वा. प्रती. अधि. सहकलम ८३.१७७ मो.वा.का. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार गाढते ब.न. १६८५ पोलीस स्टेशन नरखेड हे करीत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos