महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

अल्पवयीन मुलीवर २९ वर्षीय युवकाचा अत्याचार : आरोपी अटकेत बातम्या - Chandrapur

अल्पवयीन मुलीवर २९ वर्षीय युवकाचा अत्याचार : आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित तरुणाने तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी २९ वर्षीय युवक विरुद्ध कारवाई करून अटक केले.प्राप्त माहितीनुसार पीडित मुलगी आपल्या आई, आजी आणि लहान भावासोबत भाड्याच्या घरात राहते. मागील चार-पाच महिन्यांपासून शेजारी राहणाऱ्या युवकाशी तिची ओळख झाली होती.ऑगस्ट महिन्यात आरोपीने मुलीला आपल्या घरी बोलावून घेतले. त्यावेळी घरात कोणीही नसताना त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. बदनामीच्या भीतीने मुलीने ही बाब त्यावेळी कुणालाही सांगितली नाही.दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी मुलगी आईसोबत गावाला जाणार असल्याची माहिती तिने आरोपीला दिली होती. त्याच दिवशी सकाळी आ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चंद्रपूरच्या ड्रग्ज साम्राज्यावर पोलिसांचा मोक्का प्रहार : तस्करांच्या टोळीला मोठा दणका बातम्या - Chandrapur

चंद्रपूरच्या ड्रग्ज साम्राज्यावर पोलिसांचा मोक्का प्रहार : तस्करांच्या टोळीला मोठा दणका


- अंमली पदार्थ विक्रेत्यांवर जिल्ह्यात पहिल्यांदाच MCOCA अंतर्गत कारवाई; २१ गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरवून तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ढकलणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर चंद्रपूर पोलिसांनी अखेर कठोर कायद्याचा बडगा उगारला आहे. अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध जिल्ह्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा हादरा बसला असून, गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.रामनगर पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक ९८०/२०२६ मध्ये एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींवर अंमली पदार्थ तस्करीसोब...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सर्वोदय विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात : सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव साखरकर यांचा सत्कार बातम्या - Chandrapur

सर्वोदय विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात : सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव साखरकर यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सर्वोदय विद्यालय, बल्लारपूर येथे शनिवार, ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन समारोह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव साखरकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गजभे होत्या. प्रमुख उपस्थितांमध्ये महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, सेवानिवृत्त शिक्षक राजेश मारपल्लीवार, संजय वटाणे, दुपारपाळी प्रमुख शिक्षक गाडगीलवार तसेच सकाळपाळी प्रमुख शिक्षक अडवे यांचा समावेश होता.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सत्कारमूर्ती सदाशिव साखरकर यांचा विशेष सत्कार करण...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपूरमध्ये एलसीबी ची धडक कारवाई : ५.७५३ किलो गांजा जप्त, दोन ताब्यात बातम्या - Chandrapur

बल्लारपूरमध्ये एलसीबी ची धडक कारवाई : ५.७५३ किलो गांजा जप्त, दोन ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर-बामणी मार्गावर गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल ५.७५३ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई ५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बल्लारपूर येथील होंडा शोरूमजवळ, जिओ सेंटरसमोर करण्यात आली. जप्त गांजाची अंदाजे किंमत २ लाख ८७ हजार ६५० रुपये आहे. या कारवाईत मंगेश संतोष उंदीरवाडे २३ वर्षे रा. सोनापूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली आणि सागर बाबुराव मरगडे १९ वर्षे रा. निमगाव, ता. पवनी, जि. भंडारा यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात गस्तीवर असताना गोपनीय माहितीदाराकडून दोघे गांजाची अवैध वाहतूक करून बल्लारपूरहून बामणीमार्गे चामोर्शीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
रानटी हत्तींचा उपद्रव सुरूच : वन विभागाच्या उपाययोजना तोकड्या बातम्या - Chandrapur

रानटी हत्तींचा उपद्रव सुरूच : वन विभागाच्या उपाययोजना तोकड्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यासह कुरखेडा तालुक्यात रानटी हत्तींच्या कळपांचा वाढता वावर सुरूच असून, त्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींच्या कळपांकडून शेतीचे नुकसान होण्याची शक्यता वाढल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.रानटी हत्तींचे कळप मानवी वस्त्यांच्या तसेच शेतशिवाराच्या परिसरात येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या अपुऱ्या ठरत असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे हत्तींचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
जन्माष्टमीला वैभव कॉन्व्हेंटमध्ये अवतरले बालकृष्ण बातम्या - Chandrapur

जन्माष्टमीला वैभव कॉन्व्हेंटमध्ये अवतरले बालकृष्ण


- कृष्ण-राधेच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष; मटकी फोडीने रंगला उत्सवविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विद्या प्रगती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभूषेत सहभागी होत उपस्थितांची मने जिंकली.कृष्णाच्या आकर्षक पोशाखासह मुकुट, बासरी आणि विविध सजावटींनी सजलेले छोटे बालगोपाल शाळेच्या परिसराचे आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाचे मनमोहक सादरीकरण केले. तसेच मटकी फोडीच्या कार्यक्रमातून जन्माष्टमीचा उत्साह द्विगुणित केला.यावेळी शाळेचे संस्थापक हेमंत मानकर यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थितांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य विजय शिंदे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांम...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
जन्माष्टमीला वैभव कॉन्व्हेंटमध्ये अवतरले बालकृष्ण बातम्या - Chandrapur

जन्माष्टमीला वैभव कॉन्व्हेंटमध्ये अवतरले बालकृष्ण


- कृष्ण-राधेच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष; मटकी फोडीने रंगला उत्सवविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विद्या प्रगती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभूषेत सहभागी होत उपस्थितांची मने जिंकली.कृष्णाच्या आकर्षक पोशाखासह मुकुट, बासरी आणि विविध सजावटींनी सजलेले छोटे बालगोपाल शाळेच्या परिसराचे आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाचे मनमोहक सादरीकरण केले. तसेच मटकी फोडीच्या कार्यक्रमातून जन्माष्टमीचा उत्साह द्विगुणित केला.यावेळी शाळेचे संस्थापक हेमंत मानकर यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थितांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य विजय शिंदे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांम...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दीक्षाभूमी मुक्तीसाठी १६ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा बातम्या - Chandrapur

दीक्षाभूमी मुक्तीसाठी १६ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा


- जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार जनआंदोलन; बुद्धविहाराबाबतचा संभ्रम दूर करण्याची मागणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : येथील पवित्र दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बुद्धविहार पाडला जाणार असल्याच्या चर्चेमुळे बौद्ध समाजबांधवांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी मुक्ती जनआंदोलनच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.दीक्षाभूमीवरील संभ्रम दूर करण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देताच बैठक अर्धवट संपविण्यात आल्याचा आरोप जनआंदोलन समितीने केला आहे. त्यामुळे सम...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपूरच्या शिक्षिका सरिता रामटेके यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार बातम्या - Chandrapur

बल्लारपूरच्या शिक्षिका सरिता रामटेके यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार


- २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेसह शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी उल्लेखनीय योगदानविदर्भ न्यूज एक्सप्रेस  तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी बल्लारपूर पंचायत समितीअंतर्गत जि. प. शाळा, बामणी काटवली येथील शिक्षिका सरिता पुसाजी रामटेके यांची निवड झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल जिल्हा निवड समितीने घेतली आहे.सरिता रामटेके यांचा एकूण २८ वर्षांचा शिक्षक सेवाकाळ असून त्या बामणी काटवली येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे. यापूर्वी त्यांना प्राथमिक तालुका स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि शाळेतील शिक्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
धान उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ बोनस द्या :रमाकांत लोधे, तालुकाध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी, सिंदेवाही यांची मागणी  बातम्या - Chandrapur

धान उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ बोनस द्या :रमाकांत लोधे, तालुकाध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी, सिंदेवाही यांची मागणी 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : कृषिप्रधान देशातील महाराष्ट्रात पूर्व विदर्भात धान उत्पादक शेतकरी शासनाच्या उदासीनतेमुळे नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या चक्रव्युहात अडकलेला धान उत्पादक शेतकरी नेहमीच शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरतो. यावर्षीचे कमी पर्जन्यमान आणि त्यात वाढलेले बी बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते, मजुरी, ट्रॅक्टर व इतर अवजार भाडे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शासन एकीकडे कर्जमाफीची घोषणा करतो परंतु निवडणुकीत केलेली बोनसचा मात्र शासनाला सोयीने विसर पडतो. घामाने कमावलेल्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने धान उत्पादक शेतकरी शासनाकडे बोनस मिळावा यासाठी आश्वासक चेहऱ्याने शासनाकडे पाहतो आहे, तरी वाढती महागाई आणि भरमसाठ वाढलेल्या उत्पादक खर्चाचा विचार करता तत्काळ धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देउन निवडणुकी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →